मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे, सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल, बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे …
Read More »लाठीचार्जच्या आरोपांवरून ठाकरे-सरकारमध्ये आव्हान प्रतिआव्हान अजित पवार यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान, ...तर आम्ही तिघेही राजकारण सोडू
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्यानंतर सरकार विरुद्ध विरोधक असा सामना रंगला आहे. मराठा आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिल्याचे आरोप उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. हे आरोप सिद्ध झाल्यास आम्ही तिघेही (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार) राजकारण सोडू असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले तर महाविकास आघाडीच्या कार्यकाळात …
Read More »चार महिन्यात एकही बैठक झाली नाही आता एक महिन्यात काय होणार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लाठीचार्ज होऊन आज तीन दिवस झाल्यानंतर गाजावाजा करत सरकारने मंत्रीमंडळ उपसमितीची आज बैठक बोलावली. या बैठकीतून काय निष्पन्न झालं तर एक समिती अभ्यास करून एक महिन्यात अहवाल देणार असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करीत केला आहे. आंदोलनात जखमी झालेल्यांची सरकारने माफी मागून शांततमाय मार्गाने …
Read More »मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले, ….आरक्षणाचा जीआर घेऊन या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शिष्टमंडळ जाणार जरांगे पाटील यांच्या भेटीला
मराठा आरक्षणाचा जीआर घेवून या चर्चेची दारं खुली केलीत म्हणून तुम्ही मागचे पाढे वाचू नका असे सांगत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या उपसमितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयावर त्यांनी आपली प्रतिक्रीया माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी जालना येथील आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले. राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करतात राज्यातील तिघाडी सरकारकडून मराठा आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय …
Read More »मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी
मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे …
Read More »वातावरण तापले दोन्ही उपमुख्यमंत्री गायबः मुख्यमंत्री म्हणाले,… आरक्षण देणार सर्वसामान्यांच्या हितासाठी गतीने निर्णय घेणारे सरकार
मागील पाच-सहा दिवसापासून सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी जालन्यातील अंबड तालुक्यातील गावी आंदोलन सुरु आहे. त्यातच पोलिसांनी या आंदोलकांवर दोन दिवसाखाली लाठीचार्ज करत वातावरण आणखीनच बिघडवले असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बुलढाणा येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनुक्रमे …
Read More »राजपत्राचा दाखला देत असादुद्दीन औवेसी म्हणाले, फक्त औपचारीता पूर्ण करतायत… बहुपक्षिय संसदीय लोकशाही प्रणालीला धोका
लोकसभा निवडणूकांना अजून काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापनाही केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही महिने अगोदर देशातील पाच राज्यात निवडणूका होऊ घातल्या आहेत. मात्र तिसऱ्यांदा भाजपाला अर्थात नरेंद्र मोदी यांना बहुमताने पंतप्रधान पदी बसविण्यासाठी आता इतर राजकिय पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरु केले. …
Read More »ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी सर्व घटकांनी एकत्र राहण्याची आवश्यकता कुंभार समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द - मंत्री छगन भुजबळ
कुंभार समाज ओबीसी समाजात मोडतो. ओबीसी घटकांमध्ये कुंभार समाज लोकसंख्येने मोठा समाज असून ओबीसींच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी पुढं आल पाहिजे. ओबीसींना आपले हक्क अबाधित ठेवायचे असतील तर सर्व ओबीसी घटकांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. मंत्री छगन …
Read More »उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लेहमध्ये त्रिशुळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन महाराष्ट्र या उपक्रमाशी जोडला गेला हे आमचे भाग्य !
लेहमधील कारु येथे त्रिशुळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे ३ कोटी रुपये खर्च करुन हे संग्रहालय उभारण्यात येत असून, हा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. या संग्रहालयासाठी आणखी निधी लागला तर तो दिला जाईल. या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य …
Read More »
Marathi e-Batmya