मुंबईतील शासकिय वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मुंबईत वसतीगृहात मुलीवर झालेल्या अत्याचार व हत्येनंतर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला धारेवर धरले. तसेच असल्या घटना राज्यात …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळते? औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले?
महाराष्ट्रात कट कारस्थान करुन सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप,…सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार ना महाराष्ट्र सरकार गंभीर भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून सारखे वातावरण दुषित का होतेय?
मुंबईतील शासकिय सावित्रीबाई फुले वसतीगृहात मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एकतर महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेबद्दल केंद्र सरकार गंभीर आहे ना महाराष्ट्र सरकार गंभीर आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांचे, मुलींचे वसतीगृह आहे तिथे कॅमेरे व चांगली लॉकींग …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसीचा खरा शत्रू भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण प्रवासात ज्या वेळी ओबीसींना न्याय देण्याचा विषय आला त्या प्रत्येक वेळी त्यांच्या नेत्यांनी विरोधात काम केले. राष्ट्रवादी काँग्रेस व त्या पक्षाचे नेते हेच खरे ओबीसींचे शत्रू आहेत, असा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बोलताना केला. भाजपाने कधीही ओबीसीवर अन्याय केला नाही, असेही …
Read More »५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट काढणार राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत मंगळवारी राजभवनात अनावरण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने भारतीय टपाल विभागाच्या सहकार्याने एक टपाल तिकीट काढण्याचा निर्णय घेतला असून …
Read More »भरत गोगावले यांनी केले स्पष्ट, सूत्र सांगणार आणि आम्ही आशेवर…विचारतोच मुख्यमंत्र्यांना राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून भरत गोगावले यांनी भूमिका
राज्यात महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येऊन एक वर्ष झालं, तरी अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जात आहे. परंतु त्याबद्दल अद्याप निश्चित माहिती कोणीही दिलेली नाही. त्याच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येत नसल्याच्या मुद्यावरून ठाकरे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री पाटील यांच्या कार्यक्रमाकडे पुणेकरांनी फिरवली पाठ फक्त काही निवडक व्यक्तीच झाले उपस्थित
राज्यातील ११ उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मैदानावर कार्यक्रम आज पार पडला. तसेच नितीन गडकरी हे कार्यक्रमास ऑनलाईन सहभागी झाले होते. मात्र या कार्यक्रमाकडे पुणेकरांनी आणि भाजपा-शिंवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच चक्क पाठ फिरवली …
Read More »सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा असाही सुसंस्कृतपणा, तो शरद पवार…अक्कल शिकवणार ओबीसी नेत्यांच्या सहभागावरून टीका करताना केला उल्लेख
शिवसेनेला फोडून राज्यात भाजपाप्रणित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात आणल्यापासून राज्याच्या राजकारणातील वरचष्मा दाखविण्यासाठी कधी भाजपाच्या नेत्यांकडून तर शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून सातत्याने एकमेकांवर शेरेबाजी करताना अश्लाघ्य भाषेचा वापर करताना दिसून येत आहे. तर बरेच नेते शिवराळ भाषा वापरू लागले असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपा नेते आणि सांस्कृतिक …
Read More »“ग्लोबल वॉर्मिंग” विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धनाचे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे युरोपियन डे समारंभात बोलत होते
भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेह देखील घट्ट व्हावे, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर …
Read More »देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती,… पण लव्ह जिहादबाबत सजग बेपत्ता महिलांच्या तक्रारीवर आम्ही संवेदनशील
भाजपा नेत्यांकडून वारंवार लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला जातो. तसेच लव्ह जिहादविरोधातील कायद्याची मागणीही होते. या पार्श्वभूमीवर राज्यातील बेपत्ता महिलांची वाढती संख्या आणि लव्ह जिहादबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करण्यावर कोणताही आक्षेप नसावा, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं. ते शनिवारी ३ जून रोजी …
Read More »
Marathi e-Batmya