मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वपक्षिय नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असून आपण तीन पर्याय सत्ताधारी आणि विरोधकांना देत असून येत्या ६ जूनपर्यंत जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही असा इशारा छत्रपती …
Read More »मराठा आरक्षणविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्यांचे नागपूर कनेक्शन मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला भाजपाची रसद- काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाई लढणाऱ्या सेव्ह मेरिट सेव्ह नेशन या संस्थेचे व त्यांच्या पदाधिका-यांचे भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर कनेक्शन उघड झाले असून यात भाजप पदाधिकारीच अग्रेसर असल्याने मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत आरक्षण विरोधी लोकं व संस्थांना रसद पुरवून भाजपानेच मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे का? असा …
Read More »मराठा समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष करावा आम्ही पाठिंबा देवू आरक्षणाबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
कोल्हापूर: प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी समाजाने आज रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी कोल्हापूर येथे दिला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला भाजपा पाठिंबा देईल या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. माथेरान येथील उपनगराध्यक्ष आकाश कन्हैय्या चौधरी यांच्यासह शिवसेनेच्या …
Read More »पंतप्रधान मोदीजी, पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब २०१५ मध्ये प्रधानसेवकांनी केलेल्या वक्तव्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी करुन दिली आठवण
मुंबई: प्रतिनिधी देशाचे प्रधानसेवक २०१५ मध्ये माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं असे सांगत होते. परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता कुणाचं नशीब आहे अशी खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. जगात पेट्रोल आणि डिझेलचे …
Read More »केंद्राच्या विरोधात WhatsApp ची दिल्ली उच्च न्यायालयात धाव गोपनियता, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याची भीती
नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी संवाद आणि संपर्क साधण्यासाठी देशातील कोट्यावधी नागरीक वापरत असलेल्या WhatsApp वरील गुप्तता कायद्याचा, भाषण-अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान अर्थात आयटी कायद्याने धोक्यात येत आहे. त्याविरोधात WhatsApp ने नवी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून पत्रकार, राजकिय व्यक्ती, कार्यकर्त्ये यांचे भविष्य धोक्यात येणार असल्याची भीती याचिकेद्वारे …
Read More »लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा राज्य सरकारला सवाल
मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लसीसाठी आघाडी सरकारने काढलेल्या जागतिक निविदांना प्रतिसाद मिळालेला नसल्याने राज्य सरकारच्या टक्केवारीच्या घोळात लसीकरण निविदा प्रक्रिया अडकली आहे का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येऊ लागली आहे. अगोदरच टक्केवारी आणि वसुलीमुळे राज्य सरकार बदनाम झालेले असताना, लशीची जागतिक निविदादेखील टक्केवारीच्या घोळात गुरफटली आहे का, असा सवाल प्रदेश भाजपाचे …
Read More »केंद्रामुळे महाराष्ट्राला लस पुरवठा करण्यास कंपन्यांचा नकार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी देशातील दोन कंपन्या सोडून जगातल्या बर्याच कंपन्यांनी थेट राज्यांना लस देण्यास नकार दिला आहे. मात्र देशाची एक पॉलिसी ठरवावी आणि लसीची अंमलबजावणी करा अशी मागणी आधीपासूनच करत होतो. त्यामुळे आतातरी केंद्राने एक राष्ट्रीय पॉलिसी तयार करून ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि …
Read More »प्रियांका, कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान मोदींना छत्रपतींची आठवण केवळ मतांकरिताच होते का?- सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई: प्रतिनिधी मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली, परंतु आजपर्यंत मोदींनी त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत व इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता …
Read More »भाजपाचे पितळ उघडे पाडणाऱ्या ट्विटरची चौकशी, कार्यालयावर छापे व्यवस्थापकीय संचालकाला दिल्ली पोलिसांनी बोलाविले
नवी दिल्ली/ मुंबई: प्रतिनिधी मोदी सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसने टूल किट तयार केले असल्याचा आरोप भाजपाच्या संबित पात्रा यांनी केल्यानंतर सदरचे ट्विट हे मॅनिप्युलेटेड मिडिया असल्याचा शेरा ट्विटरने मारला. सदरचा शेरा काढून टाकावा यासाठी भाजपा नेत्यांबरोबर केंद्र सरकारने ट्विटरवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ट्विटरने अद्याप या दबावाला भीक …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधानांना भेटून काय उपयोग आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारच्याच अखत्यारीतच
पुणे: प्रतिनिधी खा. संभाजीराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणाबाबत भेट मागितली पण ती त्यांना मिळाली नाही. मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारच्या अधिकारातील असल्याने केंद्र सरकारची भेट घेऊन उपयोग नाही. याबाबत केंद्र सरकारची भूमिका ही घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीपुरती मर्यादित आहे. या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे …
Read More »
Marathi e-Batmya