पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा धार्मिक आणि अधांदूंध अशा स्वैर आणि राजकिय नेते केंद्रीत राजकारण होताना दिसत आहे. यापूर्वी राजकारणात राजकिय पक्षाचे विचार आणि धार्मिक राजकारणाऐवजी पुरोगामीत्व जपणाऱ्या राजकारणाला जनतेची आणि राजकिय नेत्यांची पसंती होती. मात्र आता राजकिय नेत्यांच्या पसंतीनुसार आणि राजकिय पक्षाच्या विचारधारेनुसार डुलणाऱ्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, त्यामुळे वाल्मिक कराडची शरणागती… फासावर लटकत नाही तोपर्यंत पोलिस कारवाई
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेल्या वाल्मिक कराड यांनी २०-२२ दिवसांपासून पोलिसांच्या शोध मोहिमेला गुंगारा देत आज अखेर सीआयडीच्या मुख्य कार्यालयात शरणगती पत्करली. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, अशा पद्धतीची हिंसा करण्याचा अधिकार कोणाला नाही. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फासावर लटकवत …
Read More »अतुल लोंढे यांचा आरोप, वाल्मिक कराडला अटक करता न येणे भाजपा सरकारचे अपयश… फडणवीसांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट, कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही, तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचा सवाल, वाल्मिकी कराडवर मोक्का कधी लावणार? वाल्मिक कराडवर जाणीवपूर्वक कारवाई नाही
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्यामध्ये वाल्मीक कराडचे नाव नाही. वाल्मिकी कराड हा ३०२ चा आरोपी होता, पण त्यात त्याचे नाव नाही. हे संपूर्ण प्रकरण लोकांच्या स्मरणातून काढून टाकण्यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, नितेश राणेसारख्या व्यक्तीला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार आहे का?… धर्मांधता व द्वेषाच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची देशात पिछेहाट
देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …
Read More »प्रियांका गांधी वड्रा यांचा आरोप, सरकारने डॉ मनमोहन सिंह यांचा अपमान केला स्मारकाच्या जागेवरून काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याच्या काही तासांनंतर, राजधानीतील त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून शनिवारी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपामध्ये एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला सुरुवात झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत म्हणाल्या की, सरकारने निगमबोध घाट स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार …
Read More »डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले
“पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. आज डॉ मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करुन बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा व आर्थिक शिस्त लावण्याचे काम डॉ मनमोहन सिंग यांनी केले …
Read More »ॲड प्रकाश आंबेडकर यांची मागणी, सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना १ कोटीची भरपाई द्या ॲड प्रकाश आंबेडकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट घेत केली मागणी
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी परभणी घटनेच्या संदर्भात त्यांनी महत्वाच्या मागण्या केल्या. परभणी प्रकरणातील पीडित सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुबियांना १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी अशीही मागणी ॲड प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. …
Read More »काँग्रेसची केंद्राकडे मागणी, डॉ मनमोहन सिंग यांचे स्मारक आणि अत्यंविधीसाठी वेगळी जागा द्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत निर्णय केंद्र सरकारला लिहिले पत्र
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यावरील अंत्यविधी आणि त्यांचे स्मारक उभारण्यासाठी दिल्लीतील यमुना नदीच्या काठावर, जिथे अनेक माजी पंतप्रधानांचे स्मारक आहेत, तेथे वेगळी जमिन मिळावी यासाठी काँग्रेसने केंद्र सरकारला पत्र लिहीत मागणी केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सूत्रांनी सांगितले. …
Read More »सुरेश धस यांचा सवाल, “आका” कडे एवढे पैसे कुठून आले? वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे नाव न घेता केली टीका
बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने निशाणा साधला आहे. शुक्रवारी त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, ‘आका’कडे १०० ते …
Read More »
Marathi e-Batmya