राज्यात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असताना शासनाकडून अद्याप मदतीची घोषणा करण्यात आलेली नाही. सभागृहात वारंवार मागणी करून देखील सरकारकडून तोंडाला पाने पुसली जात आहे. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या कृषीमंत्र्याकडून संवेदनाहीन वक्तव्य केली जात आहे. याचा निषेध व्यक्त करत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान ५०० रुपये अनुदान द्या …
Read More »उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील बैठकीत मविआने घेतला “हा” निर्णय संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करणार
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु होऊन दुसरा आठवडा सुरू झाला. यापार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री तथा ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे विधान भवनात आले. यावेळी विधान भवनातच महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी येत्या काळात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या माध्यमातून मिंधे सरकारला सळो की पळो करून सोडणार असल्याचा निर्णय …
Read More »छगन भुजबळ यांचा सवाल, बेरोजगारांच्या आत्महत्या ; बेरोजगारी वाढण्यासाठी जबाबदार कोण ? राज्यातील उद्योगातील गुंतवणूक, रोजगार यासह अनेक योजनांची स्पष्टता नाही
महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगारांची आत्महत्या झाली आहे. राज्यातील तरुणांना रोजगाराचा प्रश्न अतिशय गंभीर असून उद्योग वाढविण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी करत राज्यपालांच्या अभिभाषणात राज्यात उद्योगातील गुंतवणूक, रोजगार यासह अनेक महत्वाच्या योजनांबाबत कुठलीही स्पष्टता दिसत नाही असे मत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करतांना व्यक्त केले. विधानसभेत …
Read More »छगन भुजबळांचा सवाल, निकष पूर्ण केले तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा का नाही? अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच तासात छगन भुजबळांनी धरले धारेवर
मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच …
Read More »अजित पवारांचा इशारा, संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर खपवून घेणार नाही राज्यात घडलेल्या घटनांवर राष्ट्रवादीची बैठक; वेगवेगळ्या घटनांसाठी पक्षाची रणनीती ठरणार; अजित पवार यांची माहिती...
आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत, त्या घटना घडत असताना सत्ताधारी पक्ष वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. महागाई, बेरोजगारी या महत्त्वाच्या प्रश्नावरुन लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आहे. त्यावर चर्चा बैठकीत झाली व रणनीती ठरवण्यात आली अशी …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा शूद्र पूर्वी कोण होते पुस्तकाद्वारे डॉ.आंबेडकरांनी पहिल्यांदा मागणी केली होती
बिहार राज्याने नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यास सुरवात केलेली आहे. याच धर्तीवर बिहारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी त्यांना पत्र पाठवित केली. छगन भुजबळ यांनी …
Read More »छगन भुजबळांचा उद्योग मंत्र्यांना प्रश्न, निवडणूका झाल्या; गुजरातला गेलेले उद्योग परत येणार का? राहुल नार्वेकर यांचा टोला, भुजबळ साहेब आता काय अभिनंदनाचा ठराव मांडणार का?
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क, ड्रग्ज पार्क सारखे मोठे प्रकल्प गुजरातला नेल्यावरून तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आकाशपाताळ एक करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. मात्र प्रत्यक्ष ज्यावेळी हा प्रश्न विधानसभेत महाविकास आघाडीतील माजी मंत्री छगन भुजबळ …
Read More »सावित्रीबाई फुले स्मारक उभारणीबाबत आठवड्यात अहवाल सादर करा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना निर्देश
पुणे येथील भिडे वाडा याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी पुण्यातील भिडे वाड्यातील भाडेकरूंची बैठक घेऊन अंतिम अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात …
Read More »छगन भुजबळ यांच्या फोटो मॉर्फिंगप्रकरणी भाजपाच्या भातखळकरांवर कारवाई करा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मॉर्फ केलेला फोटो आपल्या सोशल मीडिया हँडलवर प्रसारित करून त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. याकडे माजी मंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहाचे लक्ष वेधत आमदार अतुल भातखळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर …
Read More »एनआयटी भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री म्हणाले, एकनाथ शिंदेला कोण कशाला देईल ३५० कोटी रू. विरोधकांच्या आरोपांवर दिले उत्तर
नागपूर येथील एनआयटीच्या जमिनी न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जमिन घोटाळ्याचे आरोप सुरु झाले. यासंदर्भात काही प्रसारमाध्यमांनीही वृत्त प्रकाशित झाले. त्यानंतर आज विधान परिषद आणि विधानसभेत यासंदर्भात विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. तर विधान परिषदेचे कामकाज बंद पाडण्यात विरोधकांना यश आले. या जमिन घोटाळ्याचा मुद्दा …
Read More »
Marathi e-Batmya