भारतीय राज्यघटनेनुसार राज्य सरकार राज्याच्या मुख्यमंत्री पद आणि मंत्रिमंडळातील सर्वच मंत्री हे राज्याच्या प्रशासकिय कारभारातील वजनदार आणि महत्वाची पदे आहेत. या पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून एखादा आदेश किंवा विनंती एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडे केली. तर ती राज्य सरकारकडून करण्यात आल्याचे गृहीत धरून ती विनंती किंवा आदेशाचे तंतोतत पालन केले जाते. मात्र …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला यंग अचिव्हर्स पुरस्कार
मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना यंग अचिव्हर्स पुरस्कार प्रधान करण्यात आला. सांताक्रूझ येथील …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश, या विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडईत पुनवर्सन
शिवडी-वरळी उन्नत मार्ग प्रकल्पातील एल्फिन्स्टन रेल्वे ओंलाडणी पुल बांधकाम बाधित ‘जी’आणि ‘एफ’ साऊथ विभागातील रहिवाशांचे शिरोडकर मंडई येथे पुनवर्सन करण्याचा निर्णय आज येथे घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ‘या प्रकल्प बाधितांचे शिरोडकर मंडई पुनर्विकास प्रकल्पात उत्तमरीत्या आणि वेळेत पुनर्वसन करण्यात यावे. व्यावसायिक गाळेधारकांसह जास्तीत जास्त …
Read More »न्यायालयीन लढ्याच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असून त्यासाठी वरिष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन याची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री सर्वश्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगत महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ …
Read More »मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन, पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालू
पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे …
Read More »संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान?
तीन-चार दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेवर राज्यात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उध्दव …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नातून दोन लाखा कोटींचे प्रकल्प येणार
जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज …
Read More »आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, पालिकेत सध्या तीन टी सुरु
मुंबई महापालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकूमशाही सुरु असून अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. पालिकेत सध्या तीन टी सुरु असून ते तीन टी म्हणजे टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु असल्याचा खोचक टोला लगावत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतले “हे” महत्वाचे निर्णय
दर आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मागील आठवडाभरात झाली नाही. त्यामुळे गतवेळी प्रस्तावित असलेले विषय आणि सध्याच्या चालू आठवड्यातील नवे विषय घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरूवारी झाली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास १४ हून अधिक निर्णय घेण्यात आले. ते निर्णय खालीलप्रमाणे नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी …
Read More »
Marathi e-Batmya