Tag Archives: congress

नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य,… लढाई अजून संपलेली नाही काँग्रेसच्या ५ न्याय व २५ गॅरंटी घरोघरी पोहचवण्यात सेल व विभागाचे मोठे योगदान

काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला चांगला विजय मिळाला आहे, आता विधानसभा निवडणुकीतही जिल्हा, तालुका, बुथ स्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास …

Read More »

उदय सामंत यांचे आश्वासन, चवदार तळ्याचे पाणी शुद्धीकरणासह सौंदर्यीकरणाचे काम करणार विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांच्या प्रश्नावर उत्तर

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील चवदार तळ्यातील पाणी शुद्धीकरणासाठी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर योजना राबविण्यात येईल. या योजनेसाठी ६५ कोटी रुपयांचा आणि चवदार तळे परिसर सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ७ कोटी रुपयांचा असा एकूण ७२ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल. नवीन प्रस्तावानुसार चवदार तळ्याशी संबंधित संपूर्ण विकास कामे करण्यात येतील, असे …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, ठरावाची मागणी सभापतींकडे करायची, कशाला बोट करून बोलायचे अंबादास दानवे-प्रसाद लाड यांच्यातील शिवीगाळ प्रकरणावरून केले पहिल्यांच भाष्य

संसदेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या निषेधाचा ठराव विधान परिषदेत मांडण्याची मागणी भाजपा सदस्य प्रसाद लाड आणि गटनेते प्रविण दरेकर यांनी केली होती. मात्र प्रसाद लाड यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करून बोलल्याने शिवसेना उबाठा गट आणि भाजपाचे अंबादास दानवे यांच्यात वाद निर्माण झाला. त्यावरून याप्रश्नी …

Read More »

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवे, प्रसाद लाड विधान परिषदेत भिडले सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून विधान परिषदेत गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी, त्यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा नव्हे तर तीनदा तहकूब करण्याची पाळी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर आली. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरळीत सुरू असताना, दुपारी चारच्या सुमारास भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव …

Read More »

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी साभात्याग केला. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थित केली. त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकारच्या उपाययोजना काय? पवईच्या जयभीम नगरप्रकरणी राज्य सरकार गंभीर नाही, विधानसभा अध्यक्षांच्या आदेशांकडेही दुर्लक्ष

लोणवळा येथील भूशी धरण परिसरात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ही काही पहिलीच घटना नाही, अशा घटना पावसाळ्यात वारंवार होत आहेत परंतु अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काय व्यवस्था निर्माण केली आहे. पावसाळ्यात लोणावळ्याप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही पर्यटक मोठया संख्येने भेट …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा भाजपा -आरएसएसचा डाव निवडणूक निकालानंतर मुस्लिमांवरील हल्ले वाढले

लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजपा-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी करत आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती …

Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना वादाच्या भोवऱ्यात; विरोधक आणणार हक्कभंग विधिमंडळाची मान्यता न घेताच शासन आदेश जारी

शुक्रवारी अर्थसंकल्प जाहिर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिला वर्गासाठी मुख्यमंत्री “माझी लाडकी बहिण योजना” जाहिर केली. तसेच रात्री उशीरा या योजनेचा शासन निर्णयही जाहिर केला. यावरून ही योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली असून विरोधकांनी विधिमंडळाची मान्यता न घेताच आणि राज्यपालांच्या सही शिवाय शासन निर्णय कोणत्या आधारावर जारी केला असा …

Read More »

नाना पटोले यांच्या जय भिम नगरबाबतच्या प्रश्नी विधानसभाध्यंक्षांचे आदेश जयभीम नगरमधील ६५० बेघर कुटुंबांच्या निवाऱ्याची व्यवस्था करा

पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय …

Read More »

नीट पेपर फुटीवरून काँग्रेसने राज्य सरकारला धरले धारेवरः अजित पवार यांनी केली भूमिका स्पष्ट नाशिकमध्ये परराज्यातील विद्यार्थ्यांनी बोगस प्रमाणपत्रे काढून नीट परीक्षा दिली, सरकार झोपा काढत आहे का?

विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने सुरु असलेल्या नीट परीक्षेत झोल सुरू आहे. या परीक्षेला महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी बसतात. एवढा मोठा घोटाळा होऊन सरकारची भूमिका स्पष्ट नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शिक्षण मंत्री म्हणतात काही गडबड झाली आहे. मग सरकार जबाबदारी घेणार आहे की नाही असा सवाल विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय …

Read More »