राहुल गांधी यांची घोषणा, वायनाड भूस्खलन दुर्घेटनेतील कुटुंबियासाठी १०० घरे बांधणार केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित मदत देण्याची गरज

नुकतेच केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत २००हून अधिक नागरिकांना मृत्यू झाला. तसेच संपूर्ण परिसरात चिखल आणि माती पसरली. या पार्श्वभूमीवर वायनाडचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तातडीने यांनी केरळ येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना वायनाड येथील दुर्घटनाग्रस्तांसाठी १०० घरे बांधून देणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, केरळमध्ये यावेळच्या वायनाडमधील दुर्घटनेइतकी विनाशकारी घटना एका भागात कधीच घडली नाही. मी हा मुद्दा केंद्र आणि राज्य सरकारांसमोर मांडणार आहे, कारण या शोकांतिकेला अनोखे आणि तातडीच्या प्रतिसादाची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, आमचे तात्काळ लक्ष बचाव, मदत आणि पुनर्वसन या प्रयत्नांवर आहे. काँग्रेस परिवार येथे १०० हून अधिक घरे बांधण्यासाठी कटिबद्ध आहे. या गरजेच्या वेळी आमच्या बंधुभगिनींना शक्य ती सर्व मदत केली जाईल याची खात्री करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत असेही यावेळी सांगितले.

 

About Editor

Check Also

प्रशांत किशोर यांच्या भेटीवर सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, मला रणनीतीकाराची गरज नाही’ मी प्रॅक्टीकल राजकारणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *