Tag Archives: congress

अखेर सत्ताधारी सहयोगी पक्षांच्या आमदारांनीच मंत्रालयाला ठोकले टाळे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि दादा भूसे यांच्य गाड्या फोडल्या

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्यावरून वातावरण चांगलेच तप्त झालेले आहे. तसेच अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाव बंदी केल्याने त्याचा फटका या आमदारांना बसला आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या, अजित पवार गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांसह काँग्रेसच्या काही आमदारांनी आज सकाळी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करत मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराला …

Read More »

नाना पटोले यांचे आश्वासन, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरोग्य व शिक्षणाचा कायदा करू पेटता महाराष्ट्र नको तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र हवा

राज्यातील आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु आहे, अपुरे कर्मचारी असल्याने त्याचा सार्वजिनक आरोग्य सेवेवर काय परिणाम होतो ते ठाणे, नाशिक, नांदेड व नागपूरमध्ये मागील महिन्यात झालेल्या घटनांवरून दिसले आहे. आरोग्य विभागात कर्मचारी व अधिकारी यांची हजारो पदे रिक्त आहेत पण सरकार या पदांची भरती करत नाही. आरोग्य विभाग व शिक्षण …

Read More »

अशोक चव्हाण यांची मागणी, मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीनंतर केली मागणी

राज्य सरकारने राज्यातील सरसकट सर्व मराठा समाजाला न्याय मिळेल, अशा पद्धतीने मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. मराठा आरक्षण व राज्यातील इतर ज्वलंत प्रश्नांसंदर्भात आज दुपारी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. यावेळी …

Read More »

नाना पटोले यांची मागणी,…विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट

राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणाची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही. कमी पावसामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाची स्थिती आहे, शेतकरी संकटात आहे, शेतमालाला भाव नाही. अंमली पदार्थांचे मोठे साठे …

Read More »

जरांगे पाटील यांच्या तब्येतीवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केली ही मागणी उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, जरांगे पाटील यांचे प्राण वाचविण्याची भूमिका दिसत नाही

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन सुरु केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधे न घेता आमरण उपोषण सुरु केले असून आज उपोषण आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का थांबत नाहीत ? कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करा

राज्यातील कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यात किती यशस्वी ठरल्या याचे मूल्यमापन सरकारने करावे. कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, सरकारी यंत्रणेवर याबाबतची जबाबदारी निश्चित करावी. त्याचबरोबर बळीराजाच्या हितासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून रॉयल्टी, अनामत रक्कम घेऊ नये, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. विजय …

Read More »

पीक विमा योजनेवरून नाना पटोले यांची टीका, तर मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी फडणवीस व भाजपा जनतेच्या मनातूनच डिलीट झाले, त्यांना पुन्हा संधी नाही

राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच पैसा असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी सरकारने हजारो कोटी रुपये भरले आहेत. आज राज्यात दुष्काळी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, शेतकरी आणि आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला… शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काँग्रेस पक्ष प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करेल

भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी धोरणामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. भाजपा सरकारमुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस आले आहेत. आता या सरकारचे काऊंट डाऊन …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयाचे गौडबंगाल कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय गायब होतोच कसा

कोविड काळातील दैनंदिन वापराच्या वस्तुंच्या प्रलंबित देयकाचा शासन निर्णय राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संकेतस्थळावरून अचानक गायब केला. कोट्यवधी रूपयांच्या देयकाचा शासन निर्णय अचानक गायब केल्याने संशय बळावला आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता, शासन निर्णय गायब होतोच कसा? या शासन निर्णयाचे गौडबंगाल काय? असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, वंचितच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत प्रवेश

काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यातील विविध भागातील राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, मनसे या पक्षातून शेकडो कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या उपस्थितीत काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »