Tag Archives: congress

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, हायवे समस्यांवर काही ठोस धोरण आहे का ? खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात

महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे …

Read More »

नाना पटोले म्हणाले, त्या प्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करा एनडीआरएफचे निकष जुनाट; शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे

राज्यात विदर्भ व मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, आता या सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, …

Read More »

पन्नास खोके, माजलेत बोके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपाच्या दारी… महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने ...

ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले… अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. …

Read More »

आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार

मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल केला. तसेच मेट्रोचे कारशेड कांजूर मार्ग नव्हे तर आरेतच होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र …

Read More »

काँग्रेस करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर आंदोलन ‘आरे वाचवा’साठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरासमोर उद्या आंदोलन !: समीर वर्तक

मुंबईची फुफ्फुसे असलेले आरेचे जंगल हे भविष्यातही जंगलच रहावे आणि आरेमधील मेट्रो कारशेड रद्द करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे उद्या रविवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शांततेत निषेध धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण …

Read More »

अशोक चव्हाण म्हणाले, झाडी- डोंगार- हाटिल ओक्के असतील, पण… विधानसभेत शिंदे सरकारवर केली टीका

झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण आज राज्यातील शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत, या शब्दांत महाराष्ट्राच्या सत्तांतर नाट्यावर चिमटा घेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अतिवृष्टी व पूरग्रस्तांना सरसकट भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये विरोधी पक्षांनी मांडलेल्या प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, …

Read More »

नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांना डिझेलवर सबसीडी द्या जीएसटीवरील चर्चे दरम्यान केली मागणी

महागाईने जनता त्रस्त असून पेट्रोल, डिझेलचे दर अजूनही जास्तच आहेत. शेतकरी नेहमीच संकटाचा सामना करत असतो. शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो तसेच इतर शेती कामासाठीही डिझेलचा वापर केला जातो. सध्याचे डिझेलचे दर जास्त असून शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. राज्य सरकारने डिझेलवर शेतकऱ्यांना सबसीडी देण्याचा विचार करून बळीराजाला दिलासा द्यावा, …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मुख्य व्यवसाय ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या धमक्यांना मविआ भीत नाही

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मूख्य व्यवसाय झाला आहे परंतु लोकशाहीत हे …

Read More »

मुनगंटीवारांच्या “वंदे मातरम”ला काँग्रेसकडून “जय बळीराजा” चे प्रत्युत्तर अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत; शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार मिळालेच पाहिजे

खाते वाटप झाल्याबरोबर सांस्कृतिक कार्यमंत्री झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आता फोनवर बोलताना हॅलोऐवजी वंदे मातरम म्हणावे असा आदेश जारी केला. यावरून राजकिय पटलावर त्याचे पडसाद उमटत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या या घोषणेला प्रत्युत्तर देत फोनवरून आता जय बळीराजा म्हणा असे जाहिर केले. यावेळी …

Read More »

नाना पटोले यांच्या टीकेवर मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधक त्या चष्म्या… सगळं समोरच दिसतंय की

शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपात भाजपाने स्वतःकडे महत्त्वाची खाती ठेवली आणि शिंदे गटाला केवळ झाडी, डोंगर दिल्याची खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. या टीकेबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बंडखोर शिंदे गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले, खातेवाटपाचं काम आम्ही खूप समन्वयाने केलं. भाजपा …

Read More »