Tag Archives: congress

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ निर्णय घेत मुख्यमंत्र्यांनी केले हे आवाहन वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात अस्थिर वातावरणात असतानाही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीला काही मंत्री हजर होते. तर काही मंत्री गैरहजर होते. मात्र तरीही आज झालेल्या मंत्रिमंडळ बेठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. ते खालीलप्रमाणे. वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून सध्या …

Read More »

एकनाथ शिंदे बंडाळी; ठाकरे सरकारने घेतला यु टर्न मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले माझा संपर्क सुरु आहे

राज्याचे नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील दोन नंबरचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंडाळी केली. या बंडाळीचा आज दुसरा दिवस असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार आणि विधानसभा …

Read More »

विधान परिषद निवडणूकः राज्यसभा निवडणूकीची पुर्नरावृत्ती; भाजपा, मविआ समसमान दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे प्रसाद लाड विजयी तर जास्तीचे मते मिळूनही हंडोरे पराभूत

राज्यसभा निवडणूकीतील पराभवाचे उट्टे काढण्यात महाविकास आघाडीला पुन्हा एकदा सपशेल पराभव आल्याचे दिसून आले आहे. भाजपाकडे पुरेशी मते हाताशी नसतानाही भाजपाने आपला ५ उमेदवार प्रसाद लाड यांना विजयी करून आणण्यात मोठा चमत्कार घडवून आणला आहे. तर काँग्रेसला आपली मते न राखता आल्यामुळे अशोक भाई जगताप हे विजयी झाले आहेत. तर …

Read More »

ऐन मतदानाच्या रणधुमाळीत फडणवीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये रंगल्या कोट्या फडणवीस म्हणाले काँग्रेसची मते फुटलीत

राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेचेही निवडणूकीत महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये काँटे की टक्कर होणार हे स्पष्ट झाले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि शिवसेनेने आपल्या पक्षांच्या आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवत यावेळी काहीही करून विजय मिळविण्याच्यादृष्टीने रणनीती राखली गेली. यापार्श्वभूमीवर आज मतदानाच्या दिवशीच भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, …

Read More »

विधान परिषद निवडणूकः अखेर दोन तासानंतर मतमोजणीला सुरुवात नेमका कोणाचा उमेदवार बाजी मारणार

विधान परिषदेच्या रिक्त १० जागांसाठी ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात अतरले असून या निवडणूकीत भाजपाकडून ५ उमेदवार उभे करण्यात आले आहेत. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून प्रत्येकी २ असे मिळून ६ उमेदवार उभे केले आहेत. मात्र भाजपाच्या दोन उमेदवारांनी प्रक्रियेनुसार मतदान केले नसल्याचा आक्षेप काँग्रेस नेते अशोक चव्हाण …

Read More »

विधान परिषद निवडणूकः काँग्रेसकडून भाजपाच्या दोन मतदानावर आक्षेप दुसऱ्याच्या हाताने मत टाकल्याने काँग्रेसची तक्रार केली

साधारणतः १० दिवसांपूर्वी राज्यसभेच्या निवडणूकीच्या मतदानावेळी भाजपाकडून महाविकास आघाडीच्या मतदाना दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदानावर भाजपाने आक्षेप घेतला. त्यावेळी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने रद्द केले. त्याचे उट्टे काढत आज काँग्रेसने भाजपाचे आजारी …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, केंद्रीय यंत्रणांकडून आमदारांना थेट फोन… केंद्र सरकारला अग्निपथ योजना मागे घेण्यास भाग पाडू; काँग्रेस पक्ष तरुणांसोबत

भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे चित्र देशभरात आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, त्यांना भिती घालण्यासाठी या यंत्रणांचा सर्सास गैरवापर सुरु असून विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून …

Read More »

राहुल गांधींवरील ईडी कारवाईविरोधात राज्यभर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक महिला काँग्रेसचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा

केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचा आवाज दडपू पहात आहे. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी केली असून पुन्हा चौकशीला बोलावले आहे. चौकशीच्या नावाखाली राहुल गांधी यांचा मोदी सरकार छळ करत आहे. भाजपा सरकारच्या या दडपशाहीविरोधात …

Read More »

भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांच्या बचावासाठी काँग्रेसचे नौटंकी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

‘अग्निपथ’च्या नावाखाली देशातील करोडो तरुणांची मोदी सरकारकडून क्रूर थट्टा शेतकरी, कामगार, व्यापाऱ्यांनतर आता तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र

नुकतेच केंद्रिय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह लष्कराच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेत लष्करात भरती होवू इच्छिणाऱ्या तरूणांसाठी तात्पुरती लष्करी नोकरी हमी देणाऱ्या अग्निपथ या योजनेची घोषणा केली. त्यावरून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर तरूणांचा उद्रेक पहायला मिळत असून बिहारमध्ये तर ही योजना मागे घ्यावी यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला …

Read More »