मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या संसर्गामुळे सामान्य जनतेसह मंत्री माजी मंत्रीही त्रस्त झाले असतानाच राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे नुकतेच या संकटावर यशस्वीरित्या मात करून बाहेर आले असून रेड झोनमध्ये असलेल्या या नेत्याच्या परतीचे चेंबरमध्ये काल उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात व विशेषतःदाटीवाटीचा भाग असलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत …
Read More »काँग्रेसच्या सचिन सावंतांचे भाजप नेत्यांना खुल्या चर्चेसाठी आव्हान मोदीजींच्या जन्माआधीपासूनच रेल्वे सबसिडीमध्ये चालते, कोविडसाठी काय दिले? सवाल
मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे भाड्यातील सवलतीचा भाजपचा दावा खोटा ठरला असतानाही भाजपचे नेते ते मान्य करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयात सॉलिसीटर जनरल तुषार मेहतांनीच त्यांचा हा खोटारडेपणा उघड करुनही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच दिसते. आपला खोटेपणा उघड पडला की वैयक्तिक पातळीवर घसरण्याची भाजपाची खोड जुनीच …
Read More »आशिष शेलार म्हणाले, ‘उपेक्षित’ सचिन सावंत हे तर खोटे बोलण्याची फँक्टरी स्थलांतरित मजुरांसाठीच्या रेल्वेचा ८५ टक्के खर्च हा केंद्राकडूनच भाजपाचा दावा
मुंबई: प्रतिनिधी मजुरांचे ८५ टक्के रेल्वेभाडे केंद्र सरकार भरते, हा भाजपाचा खोटारडेपणा उघडकीस आला, असा दावा करणारे एक प्रसिद्धीपत्रक काँग्रेसचे उपेक्षित प्रवक्ते सचिन सावंत यांनी काढले आहे. कुठल्याही अभ्यासाअभावी केवळ प्रेसनोटच्या भरोशावर जिवंत असलेल्या सचिन सावंत यांचे नाव सर्वाधिक खोटारडी प्रेसनोट काढणार्यांच्या यादीत आता अव्वल क्रमांकावर येत आहे. खोटे बोलण्याची …
Read More »सॉलिसीटर जनरल म्हणाले, मजुरांच्या प्रवासाचा खर्च केंद्राने नव्हे तर राज्यांनी केला केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेत्यांचा खोटरडेपणा उघडकीस- चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी : काँग्रेसची मागणी
मुंबई: प्रतिनिधी स्थलांतरीत मजुरांना गृहराज्यात पाठवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात ८५ टक्के खर्च केंद्र सरकार करत असल्याच्या भाजपाच्या दाव्यातील फोलपणा उघड झाला आहे. या प्रवाशांच्या तिकीटाचा सर्व खर्च हा राज्य सरकारांनीच केल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातून भाजपाचा खोटारडेपणा उघड …
Read More »गुजरात सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीशांची योगायोगाने बदली न्यायाधीशांच्या बदलांतील तथाकथीत योगायोग चिंता वाढवणारा : सचिन सावंत
मुंबई: प्रतिनिधी मागील सहा वर्षात अनेक न्यायाधीशांच्या तडकफडकी बदल्या झाल्या. यातील बहुतांश न्यायाधीश हे अत्यंत संवेदनशील प्रकरणे हाताळत होते किंवा त्यांनी दिलेले निवाडे आणि टिप्पण्या या भाजपशासित सरकारच्या विरोधात होत्या. मात्र या बदल्या रुटीन असल्याची सांगण्यात आले. परंतु हा तथाकथीत वाढलेला योगायोग चिंताजनक असून दोनच दिवसापूर्वी ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या …
Read More »मंत्री राऊत अधिकाऱ्यांना म्हणाले, ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करा ; अन्यथा कारवाई विदर्भ- मराठवाड्याच्या आढावा बैठकीत दिला इशारा
नागपूर : प्रतिनिधी वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे करा. वीज जाण्याची पूर्वसूचना ग्राहकांना मिळालीच पाहिजे. यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम बनवा. तसेच ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येत असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आढावा बैठकीत दिले. …
Read More »६ महिने पूर्ण करत ठाकरे सरकारने कमावलं एक बिरूद, “लढवय्या” भाजपाचा दावा फोल ठरला
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता …
Read More »‘स्पीक अप इंडिया’ मोहिमेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या संकटामुळे सर्वात जास्त अडचणीत सापडलेल्या गरीब, कामगार, स्थलांतरीत मजूर, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी काँग्रेस पक्षाने देशव्यापी चालवलेल्या ऑनलाईन मोहीम ‘स्पीक अप इंडिया’ला महाराष्ट्रातही उदंड प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकारपर्यंत या समाजघटकांचा आवाज नक्कीच पोहचला असून झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने आतातरी जागे व्हावे आणि …
Read More »आघाडीची तीन माणसं रडली की बोलली? आता रडून नाही, करुन दाखवा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा पलटवार
मुंबई : प्रतिनिधी आघाडीची “तीन माणसं” बोलली कि रडली..? कोरोना आल्यापासून हे असेच रोज रडणे सुरु आहे. कधी केंद्राच्या नावाने रडायचे.. अधी विरोधी पक्षाच्या नावानं.. आता थांबवा ही तुमची रडगाणी.. आता करुन दाखवा ना! तुम्ही मदत द्या.. शेतकऱ्यांना पँकेज द्या.. कोरोनापासुन महाराष्ट्राला वाचवा, रडू नका, अशा शब्दांत भाजपा नेते माजी …
Read More »काँग्रेस म्हणते आता आवाज पोहोचविलाच पाहिजे ‘स्पीक अप इंडिया’ ऑनलाईन मोहिम राबविणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी समाजातील गरिब लोक, मजूर, लघु व मध्यम उद्योजक यांचा आवाज बुलंद करून त्यांच्या मागण्या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेसच्या वतीने गुरुवार, २८ मे, २०२० रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० ह्या वेळेत Speak Up India स्पीक अप इंडिया ही अनोखी ऑनलाईन मोहीम चालवली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे …
Read More »
Marathi e-Batmya