नवी मुंबई विमानतळाला भूमीपुत्र दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकांची तीव्र भावना आहे, या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे. भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक दि. बा. पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ करत आहेत, परंतु कोणत्याही परिस्थितीत दुसरे नाव खपवून घेतले जाणार नाही, वेळ प्रसंगी रस्त्यावर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला शंभर दिवसांच्या प्रलंबित विषयांचा आढावा महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी
लोकहितांच्या योजनांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अधिकाधिक सुलभ आणि सहज सुविधा उपलब्ध होतील यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रत्येक विभागामध्ये वापर करण्यात यावा. महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाचा विस्तार करतांना त्यामध्ये आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा समावेश करावा असे निर्देश …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, आरोग्य सेवेत ‘एआय’ तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल, उपचार अधिक अचूक व वेळेत
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय -AI) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत ‘समग्र’ संस्थेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य सेवा बळकटीकरणाबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस आणि फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवा’चा शुभारंभ महाराष्ट्रातून निवडलेल्या १३ वर्षाखालील ६० बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन
मिशन ऑलिम्पिक २०२६ अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि २०३४ पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी तयारीचे लक्ष्य ठेवून ‘प्रोजेक्ट महादेवा’ राबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे ‘प्रोजेक्ट महादेवा’ या राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ आज वानखेडे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, राज्याचा विकास थांबणार नाही महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आजही देशातील सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक निकषांवर राज्य पात्र ठरत आहे. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक, रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज, दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम केले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाही स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ
राज्यात स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे.सामान्य घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभा सदस्य भास्कर जाधव आणि रईस शेख यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुरुवातीला प्रत्येक ग्राहकाला प्रीपेड स्मार्ट …
Read More »जयंत पाटील यांचा टोला, ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ ते ‘महाराष्ट्रात हे कधी थांबणार’ चा प्रवास राज्यात महागाई, बेरोजगार, कायदा सुव्यवस्थेची स्थिती पण सरकार म्हणतंय… बाकी सब ठीक है
१९५३ साली झालेल्या करारानुसार विदर्भातील जनतेला आम्ही वचन दिलेलं की, विदर्भातील प्रश्न मांडण्यासाठी दरवर्षी सहा आठवड्याचे अधिवेशन घेऊ. आता सहा आठवड्याचे अधिवेशन एक आठवड्यावर आले आहे. त्यात किमान एक दिवस तरी विदर्भाच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. हा विदर्भाच्या जनतेचा अवमान असल्याचा आरोप जंयत पाटील यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबईतील संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमध्ये ‘हाउसिंग फॉर ऑल’ पुनर्विकास शक्य नसल्याने नवी योजना
संरक्षण क्षेत्रालगतच्या व फनेल झोनमधील मर्यादांमुळे पुनर्विकास रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने ‘हाउसिंग फॉर ऑल’ ही नवी योजना आणल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील अनेक भागांमध्ये संरक्षण क्षेत्रालगतची जमीन, फनेल झोन तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे पूर्ण क्षमतेने पुनर्विकास करणे शक्य होत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारा कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गासाठी भूसंपादन सुरू करा
राज्याला लाभलेला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील अपार संधी लक्षात घेता २०२६ मध्ये देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधान भवन स्थित मंत्रीपरिषद सभागृहात आयोजित बैठकीत बंदरे विकास विभागाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. यावेळी मत्स्यव्यवसाय …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, वाहतूक, इ-चालानबाबत धोरण ठरविण्यासाठी अभ्यासगट स्थापणार विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्यावेळी दिले आश्वासन
मुंबई आणि परिसरात वाढती वाहनसंख्या विचारात घेता वाहतूक नियोजनासाठी तसेच वाहनांना इ-चालान देण्याबाबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. याबाबत विविध राज्य आणि देशांमधील चांगल्या उपाययोजनांचा अवलंब करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले. वाहतूक हवालदार खासगी मोबाईलवरून फोटो काढून …
Read More »
Marathi e-Batmya