गेल्या काही दिवसात राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीक्षेत्र बाधित झाले आहे. यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून येत्या दोन दिवसांत हे पंचनामे पूर्ण केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विधान …
Read More »सरकारी कर्मचारी संघटनेच्या संपाचा तिढा सुटलाः मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा संघटनेच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिली माहिती
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत निवेदनाद्वारे जाहीर केले. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे …
Read More »नाना पटोलेंचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खोचक टोला, राज्यात टाईमपास सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारकडे इच्छाशक्तीच नाही
अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. परंतु शेतकरी संकटात असतानाही राज्य सरकार मदतीसाठी काहीच हालचाल करताना दिसत नाही. केवळ पोकळ घोषणा देऊन वेळ मारून नेत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे …
Read More »एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका
दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. …
Read More »एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर, आपटी बार, फुसका बारच्या थयथयाटाला मी उत्तर देणार नाही… यांच्याकडे फक्त तीनच शब्द खोके, गद्दार आणि विकलेले गेलेले
बाळासाहेब ठाकरेंच्या विचार वाचविण्यासाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वाविरोधात आम्ही उठाव केला. ज्या काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला बाळासाहेबांनी विरोध केला. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसण्यासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून तुम्ही बंड केलात. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही खरे गद्दारी केलीत. फक्त आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवसेना वाचविण्याचे काम करत त्यांच्या तावडीतून आणल्याचा प्रत्यारोप मुख्यमंत्री …
Read More »रामदास कदमांची भास्कर जाधवांवर शिवराळ भाषेत टीका तर अंबादास दानवेंना थेट धमकीच उत्तर सभेआधीच रामदास कदमांची ठाकरे गटावर टीका
रत्नागिरीतील खेड तालुक्यातील गोळीबार मैदानावर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची जाहिर सभा झाली. यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, रामदास कदम, उदय सामंत यांच्यावर खोचक टीकाही केली. या टीकेला प्रत्युत्तर याच गोळीबार मैदानावर देणार असल्याचे रामदास कदम यांनी जाहिर केले. तत्पूर्वीच शिंदे गटाचे नेते रामदास कदम …
Read More »आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी
राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून …
Read More »अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटाच्या चिखलातः जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना बसला फटका निसर्ग कोपलाः गारपीठाचा मारा, शेतकरी झाला हवालदिल
शेतकऱ्यांच्या आयुष्यात समाधान आणि आनंदाचा उष:काल होईल असं वाटत असतानाच आज पुन्हा त्याच काळरात्रीच्या दिशेला शेतकरी लोटला गेलाय. हा उष:काल उजाडण्याआधीच शेतकऱ्यांच्या नशिबात नको असलेल्या संकटाची काळ रात्र आलीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. इतकी मेहनत केली, संघर्ष केला, यातना सोसल्या, वेळप्रसंगी अपमान सोसले, पण तरीही शेतकऱ्यांना पुन्हा पदरी यातनाच पडल्या …
Read More »पंकजा मुंडे म्हणाल्या, आमच्या आक्रमतेपणावर सध्या झाकण, पण…. कोणापुढे झुकणार नाही वक्तव्य करत इशारा
नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील नांदुर शिंगोटे येथे भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे आणि पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण आज१८ मार्च रोजी पार पडले. या कार्यक्रमाला राज्यातल्या तसेच केंद्रातल्या अनेक मोठ्या नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या …
Read More »स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला फडणवीसांची पाठ मात्र गडकरी, मुख्यमंत्री हजर नांदूर शिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न
भाजपाचे नेते तथा केंद्रीय कृषीमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण नाशिक येथील नांदूर शिंगोटे येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे या उपस्थितीत करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya