नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या काम करण्याच्या पध्दतीवर संपूर्ण देसभरातूनच अविश्वास व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांच्या नेमणूकीवरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश बाजूला सारत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकार त्यात बदल करत आयत्यावेळी नवा अध्यादेश जारी केला. तसेच विविध पातळीवरून निवडणूक आयोगाचे काम संशयातीत राहिले. …
Read More »एकतर तुम्ही किंवा मी अशा ईर्षेनेच मैदानात, उद्धव ठाकरे यांचा खणखणीत इशारा कुणाला? देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना दिला इशारा
खोट्या केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्याला इशारा देत आता एक तर तू राहशील किंवा मी असा निर्वाणीचा इशारा शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना देत आता आदेशाची वाट बघू नका आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेशही यावेळी दिले. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांचा मेळावा रंगशारदा सभागृहात झाला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी …
Read More »छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पासाठी टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर येथे टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच शिवाय एकूणच भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक सिटीमध्ये इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्स निर्मितीच्या ग्रीनफिल्ड …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा सवाल, …त्या अधिकाऱ्याचे निर्णय सरकार रद्द करणार का? सुधाकर शिंदे यांनी आठ महिन्यात घेतलेल्या निर्णयाची चौकशी करा
नियमबाह्य पद्धतीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कारभार हाती घेणाऱ्या सुधाकर शिंदे यांची अखेरीस बदली झाली. मात्र नियमबाह्य पदावर बसलेल्या अधिकाऱ्याने आठ महिन्यात घेतलेले निर्णय सरकार रद्द करणार का? असा सवाल करत हे देखील सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पुढे बोलताना विजय वडेट्टीवार …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले हे महत्वाचे निर्णय अनुदान वाटपासह विविध विभागाच्या अनुषंगाने निर्णय घेतले
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज झाली. या बैठकीला राज्याच्या विविध विभागाचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत वसतीगृहे आणि आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय नादेड येथील गुरूजी रूग्णालयाला निधी, आदीवासी सूतगिरण्यांना दिर्घ मुदतीचे कर्ज, कारागृहांच्या अत्याधुनिकीकरणासाठी निधी, जलविद्युत प्रकल्प नवीनीकरण यासह अनेक महत्वाचे …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, राज्यात ८१ हजार कोटींच्या सात गुंतवणुक प्रकल्पांना मंजुरी इलेक्ट्रीक व्हेईकल,लिथियम बॅटरी, सेमी कंडक्टर प्रकल्पांचा समावेश, २० हजार रोजगार निर्मिती
राज्यात गुंतवणुकदारांचा ओघ वाढत असून ८१ हजार १३७ कोटी रूपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा सात प्रकल्पांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी, इलेक्ट्रील व्हेईकल, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ …
Read More »‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ महिलांना मिळणार वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाना वर्षाला ३ गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देणारी “मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना” लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या योजनेचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत : या योजनेचा लाभ …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा,ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे. या भूमिकेतून आमचे काम सुरु असून येत्या काळात ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळाची स्थापन करण्याची घोषणा करून ज्येष्ठांसाठीच्या सर्व योजना या महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, सरकारचे खोके, जनतेला धोके’ असं मिंधेंच धोरण नोव्हेंबरमधे आमचं सरकार येणार, रस्ते घोटाळ्यातील भ्रष्टाचारी कॉन्ट्रॅक्टर आणि मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागणार
खड्ड्यांमुळे मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक आणि मुंबई गोवा महामार्गाची अक्षरशः चाळण झालीआहे . चाकरमानी कोकणात आता गणपतीला जातील. गडकरी यांना आवाहन आहे, त्यांनी एकदा एकदा गाडीने जावं. मग कळेल किती काम झालय. कारण मुंबई असो वा ठाणे रस्त्यावरचे खड्डे मोजावे की खड्ड्यात रस्ते शोधावे अशी स्थिती निर्माण झाली आहे अशी …
Read More »परतवारीपूर्वीच दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा आषाढ वारीतील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटींचे वितरण
आषाढ वारीत सहभागी झालेल्या राज्यभरातील १५०० दिंड्यांना सानुग्रह अनुदानापोटी ३ कोटी सुपूर्द करण्यात आल्याची माहिती शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंदा प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिंड्यांना प्रत्येकी २०००० रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली होती. परतवारीपूर्वीच याची पूर्तता …
Read More »
Marathi e-Batmya