Tag Archives: haryana

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, मागासवर्गीय अधिकाऱ्यांना हा संदेश वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरन कुमार आत्महत्या प्रकरण

हरियाणामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी पुरन कुमार यांनी सवर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या जातीय छळाला कंटाळून आत्महत्या केली, या घटनेने प्रशासनातील जातीय मानसिकतेचा चेहरा पुन्हा एकदा उघड केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “हा संदेश आहे इथल्या मागासवर्गीय आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना की, आपल्याकडे …

Read More »

राहुल गांधी यांचा सवाल, निवडणूक आयोग मतदार यादी दिल्याच्या तारखा जाहिर करेल का? महाराष्ट्र आणि हरियाणासंदर्भातील मतदार यादी दिल्याच्या नेमक्या तारखा सांगा

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीच्या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक खास लेख लिहित निवडणूक आयोगाच्या मदतीने मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप केला. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगानेही राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांकडे जाण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा अशी सूचना केली. त्यानंतर एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केंद्रीय निवडणूक आयोगाने हरियाणा आणि महाराष्ट्रातील …

Read More »

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी हरियाणातील यूट्युबर ज्योती मल्होत्राला अटक पाकिस्तानी एजंटसोबत संवेदनशील माहिती शेअर

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणा येथील ट्रॅव्हल व्लॉगर ज्योती मल्होत्रा, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे आणि तिने या वर्षाच्या सुरुवातीला शेजारच्या देशातील तिच्या भेटींचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. पाकिस्तानी एजंट्ससोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याबद्दल सहा जणांसह अटक करण्यात आलेली ज्योती मल्होत्रा ​​’ट्रॅव्हल विथ जो’ ही …

Read More »

हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, हरियाणातील निकाल हा लोकशाहीचा पराभव महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत असे गैरप्रकार करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही

हरियाणा विधानसभा निवडणूकीत काँग्रेससाठी अनुकूल व भाजपासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना आज जे निकाल आले ते आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहेत. सकाळी बहुतांश मतदारसंघात काँग्रेस पक्ष आघाडीवर असताना अचानक उलटे चक्र कसे फिरले? मतमोजणी केंद्रावर अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. हरियाणाचा विजय हा भाजपाने प्रशासनाच्या मदतीने मिळवला असल्याने हा …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचा विश्वास, परिस्थिती वेगळी, महाराष्ट्रात मविआचे सरकार येणार लाडकी बहिण योजना केवळ निवडणुकीत महिलांची मते मिळवण्यासाठी

हरियाणा विधानसभेच्या निकालाने काँग्रेस पक्ष निराश झालेला नाही. हरियाणा व महाराष्ट्रातील परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. महाराष्ट्रातील भाजपा शिंदे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असून या भ्रष्ट सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी जनता तयार आहे. राज्यातील जनतेचे समर्थन महाविकास आघाडीला मिळून मविआचे सरकार येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त …

Read More »

निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार, दुसरी सलामी महाराष्ट्राची देणार हरियाणातील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार-चंद्रशेखर बावनकुळे

हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाल्यानंतर भाजपाच्या कार्यालयाबाहेर आज विजयी मेळावा साजरा करण्यात आला. यावेळी प्रदेश भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत मिठाई वाटण्यात आले. हरियाणात अपेक्षा नसतानाही भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी ठरली. मात्र हरियाणातील भाजपाचा फॉम्युला जम्मू आणि काश्मीर राज्यात यशस्वी ठरू …

Read More »

हरियाणात बाजू पलटता पलटता राहिलीः काँग्रेसची आघाडी भाजपाकडे महिला कुस्तीपटू विनेश फोगाट झाली विजयी

लोकसभा निवडणूकीनंतर जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणूका जाहिर झाल्या. या निवडणूकांच्या माध्यमातून केंद्रातील भाजपा जम्मू काश्मीर आणि हरियाणातील सत्ता पुन्हा काबीज करेल का याची चर्चा देशात चांगलीच रंगली होती. मात्र हरियाणातील मागील १० वर्षाच्या कालखंडात तेथील शेतकऱ्यांच्या विरोधात भाजपा सरकारने घेतली भूमिका, तसेच दिलेली वागणूक, तसेच भाजपाच्या विरोधात …

Read More »

हरियाणा निवडणूकीत राहुल गांधी यांच्या डंकीच्या प्रकरणावरून वादळ पंतप्रधान मोदी मात्र न्युयार्कमधील हरियाणाच्या महिलांच्या नृत्याचे कौतुक

हरियाणातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरूख खान यांनी केलेल्या डंकी चित्रपटातील घटनेप्रमाणे काही घटना हरियाणात घडत आहेत. डंकी चित्रपटातील कलाकारांप्रमाणे बेकायदेशीररित्या युरोप आणि अमेरिकेत पैसे कमाविण्यासाठी गेलेल्या हरियाणाच्या नागरिकांना काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्या तरूणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटले. तसेच या दोघांमध्ये थेट संवादही घडवून …

Read More »

निवडणूकीच्या तोंडावर महाराष्ट्र हरयाणातील शेतकऱ्यांना असाही खुष करण्याचा भाजपाचा प्रयत्न निर्यातीवरील मार्केट कॅप काढली

हरयाणा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. यातील हरयाणात सत्ताधारी भाजपाला बाहेरचा रस्ता स्थानिक जनतेकडून दाखविण्याचा चंग बांधल्याचे दिसून येत आहे. तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची घोषणा होणे अद्याप बाकी असले तरी येथील वातावरणही विद्यमान राज्य सरकारच्या विरोधात आहे. या पार्श्वभूमीवर हरयाणा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा राग भाजपावरील असंतोष कमी करण्यासाठी …

Read More »