हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी

शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे अनेक शेतकऱी जखमी झाले. विशेष म्हणजे पोलिसांकडून कालच्यापेक्षा तीव्र अश्रुधुराच्या नळकांड्या सातत्याने सोडण्यात येत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेला चलो दिल्ली मोर्चा हरियाणा-पंजाब सीमेवरच रोखण्यात आला. जखमी शेतकऱ्यांमुळे शेतकऱ्यांनी हा मोर्चा स्थगित केला.

किसान मजदूर मोर्चाचे ४९ वर्षीय संयोजक सर्वन सिंग पंढेर पोलिसांच्या कारवाईबद्दल बोलताना म्हणाले की, एमएसपीचे महत्त्व आणि इतर मुद्द्यांसह सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला होता. तसेच शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले पाहिजे असेही सांगितले.

पुढे बोलताना सर्वन पंढेर म्हणाले की सांगितले की, सर्व पिकांसाठी एमएसपी ही मुख्य मागणी आहे. कारण त्यामुळे बाजारात जाऊन शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांचे होणारे शोषण रोखले जाईल. केंद्राने २२ पिकांसाठी एमएसपी जाहीर केला आहे. पण ते संपूर्ण स्टॉकसाठी देत ​​आहेत की नाही हे त्यांनी स्वतःला विचारावे असा सवालही केला.

अश्रूधुराच्या नळकांड्यानंतर दिल्ली चलो मोर्चा आज स्थगित करण्यात आल्यानंतर आंदोलक शेतकरी सोमवारी पुढील कारवाईचा निर्णय घेणार आहेत. शेतकऱ्यांनी रविवारी पायी मोर्चा सुरू केल्यानंतर, हरियाणा पोलिसांनी बहुस्तरीय बॅरिकेडिंगमुळे रोखण्याचा प्रयत्न केला. पण शेतकरी पुढे जाण्यासाठी आग्रही असल्याने पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात येत होता. पोलिसांच्या या हल्ल्यात पाच आंदोलक जखमी झाले.

मोर्चाच्या अगोदर, शेतकरी नेते सर्वन सिंग पंढेर यांनी आरोप केला की, आपच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकार केंद्राशी युती करत आहे आणि त्यांच्या विरोधात काम करत आहे. आंदोलनस्थळी प्रसारमाध्यमांना का थांबवले जात आहे, असा सवाल पंढेर यांनी केला. शुक्रवारी पंजाब-हरियाणा शंभू सीमेवर अश्रुधुराच्या गोळ्या लागल्याने काही शेतकरी जखमी झाले होते.

किमान आधारभूत किंमत (MSP) साठी कायदेशीर हमी व्यतिरिक्त, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन, वीज दरात वाढ करू नका, पोलिस केस (शेतकऱ्यांवरील) मागे घ्या आणि पीडितांना “न्याय” द्या अशा मागण्या असल्याचे सांगत २०२१ च्या लखीमपूर खेरी हिंसाचार, भूसंपादन कायदा, २०१३ ची पुनर्स्थापना आणि २०२०-२१ मध्ये मागील आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई या प्रमुख मागण्या असल्याचेही सांगितले.

हरियाणा सरकारचे अधिकारी रविवारी शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करण्यासाठी राजपुरा येथे पोहोचले. रविवारी ‘दिल्ली चलो’ मोर्चा स्थगित केल्यानंतर शेतकरी नेत्यांनी पुढील कृती ठरवण्यासाठी उद्या (सोमवारी) आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला.

शंभू सीमेवर पोलिसांनी केलेल्या अश्रुधुराच्या गोळीबारात पाच आंदोलक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये फिरोजपूर येथील दीदार सिंग, तरनतारन येथील मेजर सिंग आणि करनैल सिंग यांचा समावेश आहे. करनैल सिंग (७०) हे मूळचे मोगा जिल्ह्यातील झंडेना गावचे आहेत. चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाला पीजीआय चंदीगडमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी आणि ‘दिल्ली चलो’ मोर्चा काढण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी शंभू सीमेवर अश्रुधुराचा मारा सुरूच ठेवला आहे.

पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. आंदोलकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्यापैकी एक म्हणाला, “आज अश्रुधुराचा नळकांड्यांचा मारा अधिक तीव्र होताना दिसत आहे.. पूर्वीपेक्षा घशाला आणि डोळ्यात जास्त जळजळ होत आहे.” शुक्रवारी अश्रुधुराच्या गोळीबारामुळे सुमारे १५ आंदोलक जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

About Editor

Check Also

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या ७८० हून अधिक जणांचा मृत्यू अमेरिका, इस्रायलकडून हिजबुल्लाह आणि इराणवर हल्ले सातत्याने सुरुच

पश्चिम आशियातील युद्ध तीव्र होत असताना, अमेरिका आणि इस्रायलने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ले सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *