Tag Archives: maharashtra

महाराष्ट्रातील ८५ लाख ६६ हजार शेतकऱ्यांना लाभ पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता एका क्लिकद्वारे जमा

राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे असे एकूण १८ हजार कोटी रुपये थेट जमा केले. तसेच देशातील सव्वा लाख ‘पी एम किसान समृद्धी केंद्रांचे लोकार्पण केले. ही केंद्र शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त करतील, असा विश्वास …

Read More »

पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस तर रायगड, रत्नागिरीत पूर परिस्थिती

मागील पंधरा दिवसापासून जवळपास दडी मारलेल्या पावसाने काल पासून सक्रिय होत आज मुंबईसर राज्यभरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांपासून पावसानं जोर पकडला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती पुढे येत असून पावसामुळं रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती …

Read More »

आजचा दिवस मान्सूनचाः २०० हून अधिक मिमी मान्सून बरसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये बरसणार

आधीच राज्यात उशीराने आगमन झालेल्या मान्सून पावसाने जूनच्या अखेरीस येऊनही जून महिन्यातील तूट भरून काढल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता जुलै महिना अर्धा संपला तरी अद्याप पावसाने अद्याप मुंबईसर राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शेतकऱ्यांवर दुभार पेरणीचे संकट ओढावले असण्याची …

Read More »

महाराष्ट्राला विविध श्रेणीत ५ पुरस्कार शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण ५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार २०२३’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री …

Read More »

राजकारण सध्या ढवळतंय ? मग जनता कुठेय

२०१९ साली निवडणूका झाल्या आणि महाराष्ट्रासह देशात राजकिय कुरघोडींच्या राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचे सर्वांनी पाह्यलं. ह्या राजकिय कुरघोडींचा ऊत इतका आला आहे की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका वर्षभराच्या अंतराने तोंडावर आलेल्या आहेत. तसेच त्यापाठोपाठ राज्यातील विधानसभेच्या निवडणूकाही होऊ घातल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रासह देशात या कुरघोडींच्या राजकारणात नेमके कोण कोणावर …

Read More »

मान्सून आणखी दोन दिवसांनी मुंबईसह राज्यात जोरात बरसणार

केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून आता सगळीकडेच आपला लेटमार्क देत आहे. आतापर्यंत मान्सूनने महाराष्ट्र व्यापायला हवा होता. मात्र, अद्याप मान्सूनची चाहूल न लागल्यामुळे शेतकरीदेखील चिंतेत आहे. अशात तळ कोकणात आल्यानंतर अरबी समुद्रात धडकलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग मंदावला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेचा तडाका जाणवायला लागला. 21/06: IMD's Rainfall distribution …

Read More »

महाराष्ट्रातील ‘या’ ओबीसी जातींचा केंद्रीय यादीत होणार समावेश राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर

महाराष्ट्रातील लोधी, लिंगायत, भोयर पवार, झांडसे या आणि इतर मागासवर्गीय जाती केंद्रीय यादीत सूचीबद्ध करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय मागासवर्ग आयोग राबवत असल्याची माहिती राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिली. महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अहीर यांनी ही माहिती दिली. त्यांनी मागील सहा महिन्यांत …

Read More »

युनिसेफ म्हणते, महाराष्ट्रात दररोज ४ हजार ८०० बालकांचा जन्म प्रती मुल लसीकरणावर युनिसेफ खर्च करते १ डॉलर

राज्यात वर्षाला १७.४७ लाख मुले व दिवसाला ४ हजार ८०० मुले जन्माला येतात. या सर्व नवजात शिशूंचे पूर्णपणे लसीकरण करण्याची व्यवस्था शासनाकडे असल्याचे आरोग्य सचिव नवीन सोना यांनी सांगितले. पुढील पाच वर्षात १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून शासन युनिसेफच्या मदतीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरणावर केवळ १ डॉलर …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले ? CM, DyCm नी केंद्राला विचारावा , शेजारच्या राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही

या बजेटने लोकांचा भ्रमनिरास झाला असून महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या बजेटने काय दिले असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला विचारण्याची आवश्यकता आहे. शेजारी राज्याला मिळाले आमच्या महाराष्ट्राला मिळत नाही याचे शल्य मात्र महाराष्ट्रातील जनतेला कायम राहिल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी …

Read More »

देशातील सर्वाधिक मान्यताप्राप्त स्टार्टअप्स महाराष्ट्रात विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप्स, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना

नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने १६ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. केंद्र शासनाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) यांच्यामार्फत मान्यताप्राप्त असलेल्या देशातील एकूण ८८ हजार १३६ स्टार्टअप्सपैकी सर्वाधिक १६ हजार …

Read More »