Tag Archives: maharashtra

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पुरस्कार सन्मार्थींची यादी जाहिर

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती भवनाच्या मान्यतेने केंद्रीय गृहमंत्रालयाने विविध कला, सामाजिक, कृषी, उद्योग व व्यापार क्षेत्रासह, साहित्य क्षेत्रातील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरवित त्यांच्या कार्याची दखल केंद्र सरकारने घेतली. पद्मश्री पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना मान्यवरांचा पद्मश्री पुरस्कार देताना प्रामुख्याने विचार केल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराने अच्युत पालव …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कारांचे वितरण दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात २०२४ च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले. पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील अनेक खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांचा आज गौरव करण्यात आला. यामध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन ब्रॉन्झ मेडल जिंकणारी …

Read More »

एचएमपीव्ही व्हायरसचा पहिला रूग्ण मुंबईत आढळला सहा महिन्याच्या मुलीला एचएमपीव्हीची लागण

मुंबईत, सहा महिन्यांच्या मुलीला मानवी मेटापन्यूमोव्हायरस एचएमपीव्ही ची भारतातील आठवी आणि महाराष्ट्रातील तिसरी घटना म्हणून निदान झाले. गंभीर खोकला, छातीत घट्टपणा आणि ऑक्सिजनची पातळी ८४% पर्यंत घसरल्यामुळे १ जानेवारी रोजी बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवसांच्या उपचारानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील पूर्वीची प्रकरणे नागपुरात नोंदवली गेली होती, ज्यात …

Read More »

२०२४ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडलं? परिणाम… हिंदूत्व राजकारणाचा पाया पक्का? ईव्हीएमवर शंका

पुरोगामी महाराष्ट्रातील राजकारण आता पुन्हा एकदा धार्मिक आणि अधांदूंध अशा स्वैर आणि राजकिय नेते केंद्रीत राजकारण होताना दिसत आहे. यापूर्वी राजकारणात राजकिय पक्षाचे विचार आणि धार्मिक राजकारणाऐवजी पुरोगामीत्व जपणाऱ्या राजकारणाला जनतेची आणि राजकिय नेत्यांची पसंती होती. मात्र आता राजकिय नेत्यांच्या पसंतीनुसार आणि राजकिय पक्षाच्या विचारधारेनुसार डुलणाऱ्यांची संख्या समाजात मोठ्या प्रमाणावर …

Read More »

महाराष्ट्राचा आदर्श देशातील इतर राज्यांमध्ये मात्र आता राज्यात गुजरात… गुजरातच्या मंत्रालयातील प्रशासनाच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या मंत्रालयातही बदल होणार

महाराष्ट्र आणि गुजरातची निर्मिती इंग्रजांच्या काळात असलेल्या म्हैसूर प्रांतातून स्वतंत्र देशाच्या धोरणानुसार भाषावार प्रांत रचनेनुसार झाली. त्यामुळे महाराष्ट्राचा आणि गुजरातचा जन्म एकाच दिवशी न होता आधी गुजरातचा तर नंतर महाराष्ट्र निर्मितीचा दिवस साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात जे काही निर्णय़ आणि लोकोपोयोगी व प्रशासकीय निर्णयांची अंमलबजावणी करण्यात आली. …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत …

Read More »

मुख्यमंत्री पदाचा शपथ विधीः नवरदेवाचा पत्ता नाही, पण लग्नाच्या वरातीची तयारी जोरात मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात

राज्यात संशयातीत बहुमत मिळवत राज्यात सत्तास्थानी विराजमान होण्यासाठी भाजपा प्रणित महायुतीकडून शपथ विधी सोहळ्यासाठी जोराची तयारी सुरु झाली आहे. त्यातच आझाद मैदानापासून ते शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण हजर राहणार याची एक यादी आणि या सोहल्यासाठी किती लोक हजर राहु शकतील याची यादी भाजपाने तयार केली आहे. मात्र ज्या सोहळ्यासाठी भाजपाकडून …

Read More »

मराठी ई-बातम्याचा अंदाजः भवितव्य मशिन बंदः मविआ-महायुतीला किती जागा सर्व एक्झिट पोलचे अंदाज तोडणार विद्यमान निवडणूक

राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीचे मतदान आज पार पडले. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात काही प्रमाणात नाराजी व्यक्त करत सर्वच आर्थिकस्तरातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य बजावले. मात्र या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानानंतर राज्यातील कोणत्या आघाडीला किती एकूण जागा मिळणार याबाबतचे तर्क वितर्क राजकिय …

Read More »

नाना पटोले यांचा विश्वास, विधानसभेत काँग्रेसच एक नंबरचा पक्ष… बिटकॅाईन प्रकरणातील व्हायरल क्लिपमधील आवाज माझा नाही

विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसत असून महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यातील जनतेचा प्रतिसाद पाहता काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दडगावरची रेष आहे, असा ठाम विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा …

Read More »

रेरा प्रकरणी उच्च न्यायालयाचे सर्व महापालिकांना हे दिले आदेश बनावट रेरा प्रमाणपत्रांना आळा बसण्यासाठी तीन महिन्यात आपले संकेतस्थळ जोडा

घर खरेदी करणाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, रिअल इस्टेट प्रकल्प नोंदणीमध्ये पारदर्शकता यावी आणि ग्राहकांना अधिकृत गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती मिळण्यासाठी राज्यभरातील सर्व महापालिकांनी महारेरा प्राधिकरणाच्या एकात्म संकेतस्थळाला तीन महिन्यांमध्ये आपले संकेतस्थळ जोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. महापालिकांच्या बनावट मंजुरीच्या आधारे महारेरा प्राधिकरणाची परवानगी मिळवून बांधलेल्या इमारतींवर तीन महिन्यांच्या आत कारवाई …

Read More »