यवतमाळ मधील सभेने पंतप्रधान मोदी यांच्याकडून जनतेला आवाहन मुंबईः प्रतिनिधी जम्मू व काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या ४४ जवानांच्या पार्थिवाला आज दुपार पर्यंत अग्नीही मिळालाही नाही. तोच महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, आदीवासी यांच्यासह सर्वांना पुन्हा भाजपलाच आगामी निवडणूकीत विजयी करण्याचे आवाहन करत निवडणूक …
Read More »तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच काय सोक्षमोक्ष लावा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सूचना मुंबई : प्रतिनिधी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जवानांसह अनेकजण शहीद झाले. हा हल्ला केवळ दहशतवादी हल्ला नाही, तर हा गुप्तचर यंत्रणेच्या चिंधड्या उडविणारा हल्ला आहे. त्यामुळे आता कोणाला सोडणार नाही, या तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच याचा सोक्षमोक्ष …
Read More »बारामती, माढासह ६ जागा रासपला द्या
राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची भाजपकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती, माढा, हिंगोली, परभणी आणि अमरावती या सहा जागी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपने रासपला या ६ जागा द्याव्या अशी मागणी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपकडे केली. भाजपप्रणित लोकशाही …
Read More »मोदी सरकार कॅगचा उपयोग स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करतेय
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका मुंबई: प्रतिनिधी मोदी सरकार कॅगचा उपयोग स्वतःला क्लिनचिट देण्यासाठी करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करत कॅग अहवालाबाबत आणि सरकारच्या या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला. आतापर्यंत कॅगचे अनेक रिपोर्ट बघितले आहेत. मी पहिल्यांदाच कॅगच्या रिपोर्टमध्ये एखाद्या विभागाचे कौतुक करताना …
Read More »राष्ट्रवादीच्यावतीने आता ‘जॉब दो’ आंदोलन
कार्यकर्त्यांनी मोदी सरकारकडे जॉब मागणीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मुंबई: प्रतिनिधी जॉब दो… जॉब दो मोदी सरकार जवाब दो… राष्ट्रवादीची एकच पुकार जॉब दो… ये आझादी झुठी है… ये सरकार बदलनी है…मोदी सरकार हाय हाय…युवाओ को जो काम न दे वो सरकार बदलनी है… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…अशा गगनभेदी घोषणा …
Read More »निवडणूक आश्वासन: पीएमएवायच्या लाभार्थ्यांना मिळणार ३.५० लाखाचे अनुदान
मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील लाभार्थ्यांनाच मिळणार अनुदान मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूका येण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असतानाच पंतप्रधान आवास योजना अर्थात पीएमएवायतंर्गत घर घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता ३.५० लाख रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने केंद्राने नुकतेच राज्य सरकारला पत्र पाठविल्याची माहिती नगरविकास विभागातील विश्वसनीय …
Read More »अण्णा हजारे म्हणतात, जिल्हाधिकारी-तहसीलदारांनो जनतेची निवेदने उठून स्विकारा
लोकशाही टिकविण्यासाठी प्रशासनाने विचार करण्याचे आवाहन अहमदनगर : प्रतिनिधी इंग्रज गेल्यानंतर देशात लोकशाही रचना स्विकारण्यात आली. या लोकशाहीत जनता मालक झाली आहे. परंतु इंग्रजांच्या काळात असलेली प्रोटोकॉलची पध्दत देशातील सर्वच अधिकाऱ्यांकडून पाळली जात असल्याने मालक असलेल्या जनतेचा अवमान होत आहे. त्यामुळे तहसीलदार, आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकारी जनतेचे सेवक आहेत. …
Read More »मोदी, नितीशकुमारांच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर उध्दव ठाकरेंच्या भेटीला
नव्या राजकिय चर्चांना उधाण मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पार्टीचे सदस्य असलेल्या आणि जनता दल (संयुक्त)ला विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज मंगळवारी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकिय पटलावर विविध चर्चांना …
Read More »राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ब्राम्हणांसह उच्चवर्णियांना आरक्षण
केंद्राच्या धर्तीवर राज्यातही १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ब्राम्हण, मराठा यासह उच्चवर्णिय समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना केंद्राप्रमाणे राज्य सरकारमधील शासकीय सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रूपयांच्या मर्यादेत आहे, त्यांना या …
Read More »निवडणूक दिलासा : शेतकरी, महिला, मध्यमवर्गीय आणि कामगारांना प्राधान्य
केंद्रीय अर्थसंकल्पात अनेक सवलती नवी दिल्ली : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक नजरेसमोर ठेवत तेलंगणा राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६००० हजार रूपये पेन्शन, असंघटीत कामगारांना पेन्शन, गरोदर महिलांना पगारी सुट्टी, आणि मध्यमवर्गीयांसाठी कर उत्पन्न मर्यादेत ५ लाख रूपयांपर्यत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने केंद्रीय अर्थसंकल्प हा सर्वांसाठी दिलासादायक ठरविण्याचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री …
Read More »
Marathi e-Batmya