लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना घाबरून मोदी सरकारने ईडीच्या माध्यमातून सोनियाजी गांधी व राहुल गांधी यांच्यावर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली आहे. भाजपाच्या तानाशाही कारभाराविरोधात मुंबईतील ईडी ED कार्यालयासमोर मुंबई काँग्रेसकडून शांततामय व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येत असताना फडणवीस सरकारने पोलिसांचा वापर करून आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला. मला आणि …
Read More »सोनिया व राहुल गांधीवरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीने, काँग्रेस डगमगणार नाही दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज:हर्षवर्धन सपकाळ
भाजपा सरकारच्या विरोधात निर्भिडपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या देशभरातील नेत्यांवर मोदी सरकार कारवाई करत आहे. काँग्रेस नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सोनियाजी गांधी व खासदार राहुल गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने ईडीची कारवाई करण्यात आली असून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. याआधीही ईडीने सोनियाजी व राहुलजी यांची …
Read More »राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसचे पराभूत करू शकतो गुजरात विरोधकांसाठी महत्वाचे राज्य
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ एप्रिल २०२५) म्हटले की, गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निराश दिसत असले तरी, केवळ त्यांचा पक्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपाला पराभूत करू शकतो. एका आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिमेकडील राज्यात जवळजवळ ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या आरएसएस …
Read More »नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मालमत्ता ताब्यात मालमत्ता ताब्यात घेण्याच्या ईडीकडून कारवाईला सुरुवात
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी संबंधित मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कार्यवाही सुरू केली आहे. ११ एप्रिल रोजी, केंद्रीय तपास यंत्रणेने दिल्ली, मुंबई आणि लखनऊ येथील मालमत्ता रजिस्ट्रारना नोटीस बजावल्या, जिथे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या फायदेशीर मालकीची कंपनी यंग …
Read More »काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, लोकशाही हळूहळू संपवत आहेत काँग्रेसच्या ८६ व्या अधिवेशात उद्घाटन पर भाषणात बोलताना केली टीका
तामिळनाडूच्या राज्यपालांनी रोखलेली विधेयके “कार्यान्वित” करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश नरेंद्र मोदी सरकारच्या तोंडावर “थप्पड” आहे, अशी चपराक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावली. तसेच मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षावर “निवडणूक घोटाळा” केल्याचा आरोप केला. ८६ व्या अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) अधिवेशनातील आपल्या उद्घाटन भाषणात, मल्लिकार्जून खर्गे यांनी …
Read More »राहुल गांधी यांच्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही आरएसएसवर टीका ख्रिश्चन चर्चच्या मालकीच्या जमिनीच्या मुद्यावरून टीकास्त्र
कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे गैर-सरकारी जमीन मालक आहे, असा दावा करणाऱ्या आरएसएसशी संबंधित मासिक ऑर्गनायझरने त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या आता हटवलेल्या लेखावर ताशेरे ओढत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते (एलओपी) राहुल गांधी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही टीका केली. संसदेद्वारे “मुस्लिम विरोधी” वक्फ दुरुस्ती विधेयक …
Read More »राहुल गांधी यांचा इशारा, आरएसएसचे पुढील लक्ष्य चर्चच्या जमिनीवर ऑर्गनाझरमधील लेखाचा हवाला देत दिला इशारा
संसदेत वक्फ विधेयकावरील चर्चेनंतर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अर्थात आरएसएसचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील लेखाची लिंक ट्विट्द्वारे शेअर करत पुढी लक्ष ख्रिश्चन चर्च असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरएसएसच्या मुखपत्रातील एका लेखात कॅथोलिक चर्च हे देशातील सर्वात मोठे जमीनदार असल्याचा दावा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार
मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उद्या मांडण्यात येणाऱ्या वक्फ विधेयकावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचले. तसेच संसदेत मांडण्यात येणाऱ्या वक्फ बिलावर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार …
Read More »लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलण्याची परवानगी नाकारली ७० खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतली भेट
लोकसभेचे उपनेते गौरव गोगोई, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि काँग्रेसचे व्हीप माणिकम टागोर आणि इतर ७० जणांसह काँग्रेसच्या लोकसभेतील खासदारांनी बुधवारी (२६ मार्च २०२५) लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात संधी नाकारल्याचा मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी राहुल गांधी यांना …
Read More »मतदार याद्यांमधील घोळ: निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी बोलावली बैठक मतदार ओळखपत्रे आधारशी जोडण्याचा विचार
२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत अनेक ठिकाणी मतदार याद्यांमधील घोळ झाल्याचे किंवा मतदारांची संख्या अचानक वाढल्याने मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी या प्रश्नी लोकसभेत चर्चेची मागणी केली. त्यास विरोधकांमधील सर्वच राजकिय पक्षांनी यासंदर्भात पाठिंबा दर्शविला. तर काही ठिकाणी मतांच्या संख्येवरून उच्च न्यायालय आणि सर्वोच्च …
Read More »
Marathi e-Batmya