मुंबईः प्रतिनिधी कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा …
Read More »मुंबईतील शेतकरी आंदोलनात शरद पवारांसह आघाडीचे नेते राहणार उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब हे २५ जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी …
Read More »नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाच पाहिजे अन्यथा आंदोलन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा पुनरुच्चार
मुंबई : प्रतिनिधी बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे खुलासा करताना आरोप करणाऱ्या रेणू शर्माची बहीण करुणा शर्माशी आपले विवाहबाह्य संबंध असून त्यातून दोन मुले जन्माला आल्याची व त्यांना आपण आपले नाव दिल्याची जाहीर कबुली दिली आहे. हे ध्यानात घेता, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, …
Read More »पवारांचे संकेत, कायदेशीर कटकटीतूनही मुंडेंना मिळणार दिलासा पवार म्हणाले, मुंडे-शर्मा प्रकरणाची स्वतंत्र चौकशी
मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यावर आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या सदर्भात आणखी तक्रार समोर आल्यानंतर याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा निष्कर्षावर आम्ही आलो आहोत. पोलीस योग्य काम करतील असा विश्वास आहे. पोलिसांच्या चौकशीत हस्तक्षेप करण्याचं कारण नाही, पण आम्ही तपासात एसीपी दर्जाची माहिला अधिकारी असावी असं सुचवलं आहे. पोलिसांनी सर्वांशी चर्चा …
Read More »पाच तासाच्या बैठकीनंतर मुंडेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला हा निर्णय तुर्तास मंत्रिपदाचा राजीनामा नाही
मुंबईः विशेष प्रतिनिधी एका महिलेनी केलेल्या आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले. त्यामुळे मंत्रिमंडळातून मुंडे यांची गच्छंती अटळ मानली जात असतानाच त्यांना अभयदान मिळाले आहे. मुंडे यांच्यावरील आणि त्यांनी कथित महिलेने केलेल्या आरोपातील अनेक गोष्टींची कबुली दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज्य मंत्रिमंडळाच्या प्रतिमेवर …
Read More »“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली असताना दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मला वैयक्तिक फोन करून माझी सुरक्षा काढून घ्या असे सांगितले. तसेच यासंदर्भात मला पत्रही लिहिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी …
Read More »महेश कोठेंच्या पक्षप्रवेशाचे ट्विट पवारांनी डिलीट करण्यामागे कोण ? काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेविषयीचे प्रेम कोठेंच्या आडवे आले
सोलापूर-मुंबई : विशेष प्रतिनिधी गेले दोन-तीन दिवस सोलापूरातील वजनदार नेते महेश कोठे यांच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत हातावर राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार असल्याच्या निमित्ताने आणि शरद पवारांनी आधी त्यांना प्रवेश दिला व नंतर त्याविषयीचे ट्विट डिलीट केल्याने कोठे कधी नव्हे ते चर्चेत आले. त्यामुळे पवारांच्या नेमक्या त्या डिलीट मागे कोण …
Read More »शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला राज्यातील ‘आयटीआय’च्या अद्ययावतीकरणातून ‘जागतिक दर्जाच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती
मुंबई : प्रतिनिधी जागतिक औद्योगिक क्षेत्राची गरज भागवू शकतील असे कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रातून उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारण अकरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार …
Read More »औरंगाबाद नामांतरप्रश्नी अजित पवारांचे मोठे वक्तव्य… तिन्ही नेते बसून तोडगा काढतील
नाशिक : प्रतिनिधी राज्यातील औरंगाबाद शहराचे नामांतर करून संभाजीनगर नाव ठेवण्यावरून शिवसेना नेते आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणवर कलगीतुरा सुरु झाला असतानाच याप्रश्नी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी शरद पवार, सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री बसून तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला. औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन महाविकास आघाडीत विरोधाभास असल्याचे समोर …
Read More »काँग्रेसचा महाविकास आघाडीपासून फारकतीचा शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा स्वतंत्र निवडणूकीचा नारा देत सरकार पडले तर जबाबदारी आमची नाही
मुंबई : प्रतिनिधी एकाबाजूला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणूका आघाडी एकत्रितपणे लढवेल असे जाहीर केलेले असताना काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी काँग्रेस स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा केली. तर माजी आमदार नसीम खान यांनी सरकार पडले तर जबाबदारी आमची नसल्याचे सांगत महाविकास आघाडीतून फारकत घेण्याचा इशारा शिवसेनाला …
Read More »
Marathi e-Batmya