Tag Archives: sindhudurg

मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती, सिंधुदुर्गात देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार ‘एक्स-आयएनएस गुलदार’मुळे महाराष्ट्र सागरी पर्यटनात जागतिक नकाशावर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका “एक्स-आयएनएस गुलदार” समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली असून, देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प साकार होत आहे. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून …

Read More »

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा

राज्यात पुढील २४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे कोकण किनारपट्टीला २८ जून २०२५ रोजीचे ५.३० पासून ते ३० जून २०२५ रोजी ११.३० पर्यंत ३.४ ते ४.९ मीटर उंच लाटांचा इशारा …

Read More »

आपत्कालीन कार्य केंद्राचा इशारा, या घाट परिसराला २४ तासाचा ऑरेंज अलर्ट रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील २४ तासांचा इशारा

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१७ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी  आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ …

Read More »

राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मागील २४ तासामध्ये (१४ जून रोजी सकाळपर्यंत) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यात ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० …

Read More »

रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश

कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत.  अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आज महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. या जमिनींच्या जवळ पारंपरिक जुनी मंदिरे व धार्मिक स्थळे असून, त्यावर विविध विकासकामांचे प्रस्ताव प्राप्त झाले …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची शिवाजी महाराजांची माफी मागतानाही राहुल गांधींवर टीका स्वातंत्रवीर वि.दा. सावरकर यांच्या अवमानाचा शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याची तुलना

शिवाजी महाराज हे आमचे दैवत असून दैवतासमोर अनेकवेळा झुकले तरी आम्हाला त्याचे वावगे नाही. सिंधूदुर्गात मागील काही दिवसात जी घटना घडली. त्या घटनेबद्दल मनात खेद आहे. तसेच या घटनेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांची पायाशी डोकं ठेवत त्यांची माफी मागत असल्याचे सांगत काहीजण स्वातंत्रवीर वि दा सावरकर यांचा अवमान करतात परंतु …

Read More »

या पाच जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार

महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांनाही मोठा …

Read More »

सोलापूरचे सुपुत्र न्यायमुर्ती उदय लळीत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांनी घेतली शपथ

भारताचे ४९ वे  सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांनी आज शपथ  घेतली. राष्ट्रपती भवनाच्या दरबारहॉल मध्ये आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी न्या.लळीत यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. या शपथग्रहण समारंभास उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी उपराष्ट्रपती एम.व्यंकैया नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा, केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरेण रिजेजू यांच्यासह केंद्रीय मंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि …

Read More »

अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा निर्णय: व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ अतिवृष्टीसह पुरबाधितांच्या कर्ज पुरवठ्यासाठी जिल्हा बँका देणार या नाममात्र व्याज दराने कर्ज

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यवसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ५० हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला. आता त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार …

Read More »

विरोधकांवर पलटवार करत मुख्यमंत्र्यांचे कोकणवासियांना आश्वासन संपूर्ण आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करणार, कोणीही वंचित राहणार नाही

रत्नागिरी : प्रतिनिधी तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी वैफल्यग्रस्त नसल्याचा टोला लगावला तर सिंधुदूर्गात विशेषत: मालवणमध्ये आपण फक्त फोटो काढण्यासाठी आलेलो नसल्याचे सांगत विरोधकांच्या टीकेला प्रतित्तुर देत चक्रिवादळामुळे बाधित झालेल्या प्रत्येकाला नुकसान भरपाई देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »