हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी एमसीडब्ल्यू इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) मधील आठ उच्च-प्रभावी हवामान नवोन्मेषकांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये तरुणांनी विकसित केलेल्या दोन उपायांचाही समावेश आहे. हे पुरस्कार समारोपाच्या सत्रात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या …
Read More »राज्यपाल देवव्रत यांचे आवाहन, पर्यावरण तज्ञांनी कृषी क्षेत्राकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकचा समारोप
कृषी क्षेत्रातील रसायनांच्या वाढत्या वापरामुळे शेती बरोबरच पर्यावरणाचीही मोठी हानी होत आहे. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम घातक आहेत. त्यामुळे एकूणच पर्यावरण तर प्रदूषित होतच आहे, शिवाय गंभीर आजारांचे संकटही वाढत आहे. त्यामुळे पर्यावरण तज्ज्ञांनी जागतिक पर्यावरण रक्षणाचा विचार करताना कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग देशातील पहिल्या मुंबई क्लायमेट वीकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कृती आवश्यक असून मुंबई क्लायमेट वीक हा त्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास महाराष्ट्र तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हवामान कृती ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची किल्ली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. …
Read More »मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचे अवकाशवीर एकाच मंचावर राकेश शर्मा–शुभांशु शुक्ला यांची उपस्थिती; सचिन तेंडुलकर करणार गौरव
भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू शुक्ला प्रथमच एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक क्षणी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे. हा विशेष कार्यक्रम “सारे जहाँ से अच्छा” या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे. अवकाशातून भारत कसा दिसतो, या …
Read More »ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ञाला मुकलो
पर्यावरण संतुलनाच्या क्षेत्रासाठी आयुष्य वेचणारे डॉ. माधव गाडगीळ व्रतस्थ पर्यावरण शास्त्रज्ज्ञ म्हणून सदैव स्मरणात राहतील, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस शोक संदेशात म्हणतात, डॉ माधव गाडगीळ यांनी पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी यासाठी विशेष …
Read More »हवामान खात्याचा इशारा, चक्रीवादळ आणि मुसळधार पाऊस पडणार २६ ते २८ ऑक्टोंबर दरम्यान येणार
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेले एक दबाव तीव्र चक्री वादळात तीव्र होऊन २८ ऑक्टोबर रोजी मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यानच्या काकीनाडाभोवती आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडण्याची अपेक्षा आहे, असे भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार. चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे की, हवामान प्रणाली पश्चिम-वायव्येकडे सरकत आहे आणि २६ ऑक्टोबरपर्यंत खोल दाबाच्या पट्ट्यात, २७ …
Read More »हवामान खात्याकडून १७ ते २१ ऑक्टोंबर पर्यंत जारी केली सूचना मच्छिमारांनी समुद्रात न जाण्याच्या हवामान खात्याच्या सूचना
भारतीय हवामान विभागाने आणि आयएनसीओआयएस संस्थेने मुंबई शहर जिल्ह्यासह किनारी भागातील मच्छिमारांना पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. १७ ते २१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दक्षिणेकडील समुद्री क्षेत्रात वादळी वारे आणि उंच लाटांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान केरळ, कर्नाटक किनारपट्टी, तसेच लक्षद्वीप, कोमोरिन, मालदीव …
Read More »आयएमडीचा इशारा, ऑक्टोंबर महिन्यातही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आयएमडीचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांची माहिती
भारतातील पावसाळ्यात ऑक्टोबरमध्ये सामान्यपेक्षा १५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी दिली. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये पूर्व-ईशान्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर देशाच्या इतर भागात कमाल तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची …
Read More »सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती
भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक पथके तैनात करण्यात आली …
Read More »हवामान विभागाचा ठाणे जिल्ह्याला दिला रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट २८ सप्टेंबरला रेड, २९ ला ऑरेंज तर ३० सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांना आणि कार्यालय प्रमुखांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रशासकीय यंत्रणा कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास व नागरिकांना मदत करण्यास …
Read More »
Marathi e-Batmya