हवामान

रत्नागिरीत चक्रीवादळामुळे चार जण जखमी जीवीतहानी नाही वित्तहानी नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती

रत्नागिरी: प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले मात्र जीवितहानी नाही. तसेच नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …

Read More »

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई जिल्ह्यातील सर्व विभागांनी दक्ष रहावे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी ३ जून रोजी येणाऱ्या संभाव्य चक्री वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागासोबत संभाव्या वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या. रेल्वेची वाहतूक …

Read More »

मान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे …

Read More »

राज्यात उखाडा वाढणार : बहुतांष जिल्ह्यात ४० पार तापमान काळजी घेण्याचे हवामान खात्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात एकाबाजूला कोरोनाचा कहर सुरु असतानाच आता तापमानाचा कहरही सुरु झाला आहे. बहुतांष जिल्ह्यात दिवसभरात ४० पार वातावरण गेले असून काही दिवस असाच उखाडा राहणार असल्याचे हवामान खात्याचे के.एस.होसळीकर यांनी सांगितले. बारामती ४०, ठाणे ४०, उस्मानाबाद ४२, औरंगाबाद ४१, सांगली ४१, जेऊर ४२, मालेगांव ४४, अकोला ४४, अमरावती …

Read More »

मुंबईत हुडहुडी, नाशिक आणि जळगावात थंडीची लाट १० ते १५ अंश सेल्सियस खालीपर्यंत तापमान घसरले

मुंबईः विशेष प्रतिनिधी सततच्या अवकाळी पावसामुळे आणि पर्यावरणातील बदलामुळे यंदा थंडीचा भलताच गारठा मुंबईकरांना जाणवायला लागला आहे. दिवस उजडून माथ्यावर आलातरी वाजणारी थंडी कमी होत नसल्याने मुंबईकरांनी दिवसाही स्वेटर, जॅकेट घालण्यास सुरूवात केल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यातच १७ आणि १८ जानेवारी रोजी नाशिक, जळगांव मध्ये थंडीची लाट येणार असल्याचे …

Read More »

राज्याच्या वनविभागाला “अर्थ केअर पुरस्कार” पर्यावरण रक्षणात योगदान देणारा प्रत्येकजण पुरस्काराचा मानकरी- विकास खारगे

मुंबई: प्रतिनिधी जेएसडब्ल्यू- टाईम्स ऑफ इंडियाकडून ‘इनोव्हेशन फॉर क्लाईमेट एक्शन’ साठी दिल्या जाणाऱ्या ‘अर्थ केअर’ पुरस्काराने काल वन विभागाला सन्मानित करण्यात आले. तीन वर्षात लोकसहभागातून करण्यात आलेल्या ५० कोटी वृक्षलागवडीसाठी अवलंबिलेल्या डिजिटल फॉरेस्ट गव्हर्नंससाठी वन विभागाला हा पुरस्कार मिळाला आहे. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि ३ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप …

Read More »

मच्छिमारांनो समुद्रात जाऊ नका चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिवांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी अरबी समुद्रातील महा चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असे आवाहन करत जे मासेमारी करण्यासाठी गेलेत. त्यांना परत बोलवावे असे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले. अरबी समुद्रात महा नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव …

Read More »

१८ ते २० ऑक्टोबर दरम्यान राज्यात वादळी पाऊस पडणार शेतकऱ्यांनो पिकांना सुरक्षित ठेवा- हवामान खात्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी नैऋत्य मान्सूनचा पाऊस परतल्यामुळे राज्यात सध्या कोरडे हवामान आहे. परंतु १८ ऑक्टोबरपासून परत एकदा विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात दुपारनंतर ढगाळ हवामानासह वादळी पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर; कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी; तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील …

Read More »

तीन महिन्यात ३३ कोटीपैकी ३१ कोटी वृक्षांची लागवड नाशिक, नांदेड, चंद्रपूर, पुणे, यवतमाळसह कोल्हापूरात १ कोटीहून अधिकची वृक्ष लागवड झाल्याची वनमंत्री मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्याच्या वन विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जुलै ते सप्टेंबर महिना अजून पूर्ण होण्याच्या आताच राज्यात ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षांची लागवड झाली असून ही संख्या ३३ कोटी संकल्पाच्या ९०.६५ टक्के इतकी …

Read More »

आरोग्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंडळ करणार हवामान बदलाच्या परिणामाचा अभ्यास आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना

मुंबई: प्रतिनिधी दिवसेंदिवस निसर्ग आणि हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहे. या हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करुन त्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय नियामक मंडळाची (गव्हर्निंग बॉडी) तर आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. मानवी आरोग्यावर वातावरणातील बदलाचा काय परिणाम …

Read More »