चंद्रकांत पाटील यांच्या अडचणीत पुन्हा वाढ न्यायालयाने बजावली कोल्हापूर पोलिसांना नोटीस

पुणे: प्रतिनिधी

विधानसभा निवडणूकीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील पोलिस ठाण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याची माहिती आणि उत्पन्नाचे स्त्रोत लपविल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने कोल्हापूर पोलिसांना नुकतीच नोटीस बजावल्याची माहिती डॉ. अभिषेक हरिदास यांनी दिली. यासंदर्भात डॉ.हरिदास यांनी याचिका दाखल केली.

यापूर्वी पुण्याच्या कोर्टात डॉ. हरिदास यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती. परंतु कोर्टाने दिलेल्या निकालाच्या विरोधात डॉ. हरिदास यांनी अपिल दाखल केले. त्यावर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयानेही ते अपिल दाखल करून घेत कोल्हापूर पोलिसांना नोटीस बजावली असून यासंदर्भातील माहिती सादर करण्याचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले. या याचिकेसाठी भारतीय जनसंसादचे प्रभाकर कोंढाळकर व हमारा विश्व फौंडेशनचे अनिता ताई अगरवाल यांचे सहकार्य लाभले.

राज्याच्या विधानसभा निवडणूकीत सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील कोथरूड मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात उत्पन्नाच्या स्त्रोतासह स्वत:वरील गुन्ह्याची माहिती लपविली. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रातील माहितीचा अभ्यास केला असता पाटील यांनी अनेक गोष्टींची खरी कल्पना निवडणूक आयोगाला दिली नाही. त्यामुळे त्यांनी शुध्द फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याने आपण पुणे जिल्हा न्यायालयात धाव घेतल्याची त्यांनी मराठी ई-बातम्या.कॉमशी बोलताना सांगितले.

पाटील हे दोन कंपन्यावर संचालक आहेत. तसेच त्या कंपन्यांच्या संचालक पदाचे नंबर कार्पोरेट अफेअर विभागाच्या वेबसाईटवर आहेत. त्याची माहिती पाटील यांनी प्रतिज्ञा पत्रात दिली नाही. त्याशिवाय चंद्रकांत पाटील यांच्यावर कोल्हापूर येथील राजाराम पुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पुणे येथे निवडणूकीत प्रतिज्ञापत्र सादर करताना सदरप्रकरणी गुन्हे निश्चित केले नसल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रत्रिज्ञा पत्रात म्हटले आहे. ही बाबही त्यांनी खोटीच निवडणूक आयोगाला सांगितल्याचे स्पष्ट झाले असून वास्तविक पाहता त्यांच्यावर गुन्हे निश्चित झालेले असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १५० दिवसांच्या ई- गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट विभागांचा गौरव कामात पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर विभागांनी काम करावे

राज्यातील नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एकाच माध्यमातून मिळण्यासाठी आणि विकसित महाराष्ट्राचे ध्येय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *