अल्पसंख्याकांबद्दल सरकारच्या मनात आहे तरी काय? एकनाथ खडसे यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी

विरोधी पक्षात असतांना ज्या गोष्टीसाठी आंदोलन केली सभागृह बंद पाडली त्या मागण्या तरी राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे अशी मागणी खडसे यांनी सरकारकडे करत अल्पसंख्याकाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत असून सरकारने अल्पसंख्याबाबत सरकारच्या मनात आहे तरी काय ? असा सवाल करत राज्य सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल टीका केली.

विधानसभेत विभागवार अनुदान देण्याच्या प्रस्तावावर बोलताना खडसे यांनी टीका करत अल्पसंख्याकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याची सल्लाही सरकारला दिला.

सरकारच्या विरोधात भूमिका घेत सरकार अल्पसंख्याकाच्या विरोधात काम करत आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने अल्पसंख्यांकासाठी मंजूर केलेल्या तंत्रनिकेतनला निधीच उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे सरकारची भूमिका काय आहे स्पष्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

अल्पसंख्याक, तसेच मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न गंभीर आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक आणि  इतर मागासवर्गीयासाठी जिल्हास्तरावर आणि तालूकास्तरावर वस्तीगृह उभारण्याची गरज असून सरकारने मुला-मुलींसाठी वसतीगृह उभारावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *