दोन वर्षात ७२ हजार जणांना सरकारी नोकऱ्या देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील विविध विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यातील ७२ हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यातील ३६ हजार जागा यावर्षी तर राहीलेल्या ३६ हजार जागा पुढील वर्षी भरणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली.

राज्य सरकारकडून कृषी विभाग २ हजार ५७२, पशु व दुग्धसंवर्धन विभागातील १ हजार ४७, मत्सव्यवसाय विभाग ९०, ग्रामविकास विभाग ११ हजार ५, गृह विभाग ७ हजार १११,  सार्वजनिक बांधकांम विभाग ८ हजार ३३७, जलसंपदा विभाग ८ हजार २२७, जलसंधारण विभाग ४ हजार २२३, सार्वजनिक आरोग्य विभाग१ हजार आणि नगरविकास विभागाच्या १ हजार ५०० जागा अशा मिळून एकूण ३६ हजार रिक्त जागा यावर्षी तर दोन वर्षात मिळून ७२ हजार जागा भरणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

About Editor

Check Also

राहुल गांधी यांचा भाजपावर आरोप, भारताचा निवडणूक नकाशा चोरण्याचा प्रयत्न ओबीसींचे अधिकारही नाकारण्याचा प्रयत्न

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसदेत जोरदार हल्ला चढवला. महिला आरक्षण चौकट आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *