राष्ट्रपती मुर्मु यांनी महाराष्ट्रासह या १३ राज्याच्या नव्या राज्यपालांची केली नियुक्ती राज्यपाल कोश्यारी यांच्यासह १३ राज्यपाल पदमुक्त

मागील महिन्यात आपल्याला पदमुक्त करावे अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानंतर दुसरा महिना उजाडला तरी त्यावर केंद्र सरकारने निर्णय न घेतल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी दाखवून दिली. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर रात्रीत मंजूर करत १३ राज्यांचे राज्यपालही बदलण्यात आले असल्याचे राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आले.

त्यामुळे महाराष्ट्राला आता नवीन राज्यपाल मिळणार असून, रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली.

बदलण्यात आलेले १३ राज्यांचे राज्यपाल पुढील प्रमाणे, अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल – लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, सिक्कीमचे राज्यपाल – लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल – सीपी राधाकृष्णन, आसाम राज्यपाल – गुलाबचंद काटरिया आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिवप्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी राधाकृष्णन माथूर यांचा लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर ब्रिगेडियर म्हणून राजीनामा स्वीकारला. बीडी मिश्रा यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मणिपूरचे राज्यपाल ला गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल फागु चौहान यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती एस अब्दुल नजीर यांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आंध्र प्रदेशचे राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती आणि छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुईया उकिये यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे.

यासंदर्भात आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी हे आदेश जारी केल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईत ४० टक्केही मॅपिंग झालेले नाही, ते पूर्ण करा

लोकशाही व्यवस्थेत निवडणुका हा एक उत्सव आहे, या उत्सवात सर्वांचा सहभाग असला पाहिजे परंतु एसआयआर मोहिम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *