देवेंद्र फडणवीस म्हणाले, म्हणून यांना (उध्दव ठाकरे) रस्त्यावर आणून सोडले एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव मिळवून दिल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत फडणवीसांचे वक्तव्य

असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले. दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भाजपच्या विजय संकल्प सभेला रविवारी सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

फडणवीस म्हणाले, सत्तेसाठी त्यांना खुर्ची महत्वाची वाटली आणि विरोधकांशी संसार थाटला. शिवाय पंचवीस भाजपशी युती सोडली अशी भाषा केली. काळाचा महिमा असा की असंगाशी संग केल्याने काय होते ते त्यांना आता कळले. दोन्ही काँग्रेसशी त्यांनी सत्तेसाठी सोबत केली पण त्यांनी यांना रस्त्यावर आणून सोडले. बेईमानी केली की काय होते ते त्यांना ६ महिन्यापूर्वी दाखवली आहे. शिवसेनेचा विचाराचा वारसा चालवणारे एकनाथ शिंदे यांना शिवसेना आणि धनुष्य बाण चिन्ह मिळाले आहे. देशात भाजपची सत्ता आणण्याची सुरुवात कोल्हापुरातून करूया,असा संकल्प फडणवीस यांनी बोलून दाखवले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देणार ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित , ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील विद्यार्थी सहभागी

महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने प्रशासनासमोरील आव्हानांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविण्यासाठी युवा प्रतिभांना व्यासपीठ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *