ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

या सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अंशू सिन्हा यांची नियुक्ती महाराष्ट्र बाल हक्क आयोगावर करण्यात आली आहे.

तर दिलीप गावडे यांची डेअरी डेव्हलमेंटच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी रूबल प्रखेर अग्रवाल यांची महा मुंबईच्या मेट्रो च्या व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच आयएएस अधिकारी स्वाती म्हसे-पाटील यांची नियुक्ती फिल्मसिटीच्या व्यवस्थापीक संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय आयएएस अधिकारी रमेश चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना सोसायटीच्या मुख्याधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शुभम गुप्ता यांची सांगली-मिरज-कुपवाडच्या महानगरपालिकेच्या आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची ग्वाही, आरे परिसरात भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल निर्माण करणार आरे परिसरात ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – ३०० कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *