आदित्य ठाकरे यांचा सवाल, लुटीसाठी बीएमसीची निवडणुक घेत नाही का? अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम

‘मुलुंड मध्ये पीएपी प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही. फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे. पण धारावी प्रकल्पात ७०% जमीन बीएमसीची आहे. त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी म्हाडाला मिळायला हवे होते. मात्र हे पैसे अदानी स्वतःला घेणार असून ते पैसे बीएमसी, म्हाडाला मिळणार नाहीत असं सरकारचं भ्रष्ट धोरण असल्याचा आरोप आज बोलताना केला.

शिवसेना उबाठा नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी धारावी संदर्भातील सरकारच्या भ्रष्ट धोरणाबाबत टीका केली.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, वीस दिवसात एमएमआरडीएने १५ हजार कोटी रुपयांच टेंडर काढल. ४० हजार कोटीची थकबाकी कॉन्ट्रॅक्टरची आहे. आता हे कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करणार आहेत. धारावीतील प्रकल्पातील लँड प्रीमियम मुंबई पालिका आयुक्तांनी का घेतला नाही ? हा जनतेचा पैसा आहे, आणि याच करणासाठी तुम्ही मुंबई महापालिका निवडणुक तुम्ही घेतली नाही का ? असा सवाल करत १ आठवडा झाला आयुक्ताना पत्र दिलं आहे, पण अजूनही उत्तर दिलेल नसल्याचेही यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम सरकार कडून सुरु आहे. मिंदे सरकार कडून लूट सुरु आहे. मिंदेच नगरविकास खाते आणि बीएमसी लूट करत आहे असं म्हणत पालिका आयुक्तांच्या बेजबाबदार आणि निष्क्रिय वर्तणुकीवर बोट ठेवतानाच सरकारचाही समाचार समाचार घेतला.

आमचं सरकार आल्यावर वांद्रेतील शासकीय वसाहतीच्या रहिवाश्यांना मालकी हक्काची घरं देणार

वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधील रहिवाशी गेल्या ४ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत . या उपोषणस्थळी आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली . ग. क्वा. रे. असोसिएशनतर्फे रहिवाशांचे गेले चार दिवस मालकी हक्कासाठीचे घर, भूखंड मिळण्याकरिता आमरण उपोषण सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांनी वाद्रे असोसिएशनसाठी भूखंड मंजूर केला होता. मात्र सरकार बदलताच इतर प्रकल्पांप्रमाणेच या प्रकल्पाची कार्यवाही रखडली. त्यामुळे आपलं सरकार आल्यावर पाठपुरावा करून नक्कीच न्याय मिळवून देऊ, असा विश्वास उपोषणकर्त्यांना आदित्य ठाकरे यांनी दिला.

About Editor

Check Also

अनिल देशमुख यांची टीका, परमबीर सिंगाच्या “पापाचा घडा” भरला लीलावती रूग्णालय़ाने अपमानास्पदरित्या बदतर्फ केल्याने त्यांचे चारित्र्य जनतेसमोर

ज्या परमबीर सिंग याने मी गृहमंत्री असतांना माझ्यावर खोटे आरोप करून मला बदनाम करण्याचे षडयंत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *