राज्य सरकारकडून देशी गायीला गोमातेचा दर्जा मात्र मंदिराबाहेर जर्सी गायीला गोग्रास मंदिरांबाहेर गोग्रासाठी देशी गायींऐवजी ‘जर्सी प्राणी’ बांधून हिंदूंची दिशाभूल

महाराष्ट्र शासनाने गोमातेला अर्थात देशी गायींना ‘राज्यमाता’ म्हणून दर्जा दिला आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये ‘गोमाता’ म्हणजे ‘जर्सी गायी किंवा प्राणी’ नव्हेत, तर भारतातील ‘देशी’ गायी अपेक्षित आहेत. त्यामुळे राज्य शासनानेही ‘जर्सी’ प्राण्यांसाठी नव्हे, तर भारतातील देशी गायींच्याच पालन-पोषणासाठी अनुदान घोषित केले आहे. मुंबईत मात्र मंदिरांच्या बाहेर गोग्रासासाठी ‘देशी’ गायींऐवजी गोमातेप्रमाणे दिसणारे ‘जर्सी प्राणी’ बांधून हिंदूंची दिशाभूल केली जात आहे. हिंदूंही ‘जर्सी प्राण्यांनाच गोमाता समजून गोग्रास देत आहेत.

गिरगावमधील चर्ची रोड येथील कृष्ण बाग या प्राचीन मंदिरांच्या बाहेर ‘गाय’ म्हणून ६ जर्सी प्राणी बांधण्यात आले होते. या मंदिरात येणारे भाविक गोमाता समजून जर्सी प्राण्यांना गोग्रास देत होते. मुंबईत बहुतांश मंदिरांमध्ये ही स्थिती दिसून येत आहे.

महाराष्ट्रात मराठवाड्यात ‘देवणी’ आणि ‘लालकंधारी’, पश्चिम महाराष्‍ट्रात ‘खिल्लार’, उत्तर महाराष्‍ट्रात ‘डांगी’, तर विदर्भामध्ये ‘गवळाऊ’ प्रकारच्‍या देशी गायी आढळतात.

या देशी गायींचे दूध पौष्टिक असल्यामुळे ‘पूर्णअन्‍न’ समजले जाते, तसेच आध्यात्मिकदृष्ट्याही भारतातील देशी गायींचे महत्त्व असल्यामुळे त्यांनाच गोमाता म्हटले जाते. जर्सी प्राण्यांना गोमाता म्हटले जात नाही. सद्यस्थितीत अनेकांना याविषयी माहिती नसल्याचा गैरफायदा उठवून पैसे कमवणारे लोक गोमातेऐवजी जर्सी प्राण्यांना मंदिरांबाहेर बांधत आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने जर्सी प्राण्यांना बांधून त्यांच्या मार्फत पैसे कमाविण्याच्या उद्योगाला चाप लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

About Editor

Check Also

मुंबईतील १२ अग्निशमन अधिकारी, जवानांना राष्ट्रपती पदके प्रदान राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा सप्ताहाचे उदघाटन

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकभवन मुंबई येथे अग्निशमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *