विधानसभा निवडणूकीसाठी आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४५ उमेदवारांची यादी जाहिर केली. त्यानंतर रात्री उशीराने काँग्रेस पक्षाच्यावतीने ४८ आमदारांची यादी जाहिर केली. आज काँग्रेसने उमेदवारांची यादी जाहिर करताना मुंबईतील पाच जागांवरील उमेदवारी जाहिर करत पश्चिम महाराष्ट्रातील आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघातील उमेदवार जाहिर केले.
काँग्रेसकडून विद्यमान आमदारांना संधी देत भाजपातून पुन्हा काँग्रेसवासी झालेले गोपाल अगरवाल यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलेली आहे. तर राजकिय पुनर्सनाच्या प्रतिक्षेत असलेले नसीम खान यांना उमेदावारी जाहिर करण्यात आलेली आहे. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडूण आल्याने त्यांच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांच्या भगिनी डॉ ज्योती एकनाथ गायकवाड यांना उमेदवारी काँग्रेसकडून जाहिर करण्यात आली आहे. याशिवाय प्रविण चौरे, शिऱिषकुमार नाईक, सुनिल देशमुख, बंटी शेळके, गोपालदास अगरवाल यांच्यासह अनेक नवख्या आमदारांना संधी देण्यात आली आहे. तर विद्यमान २४ आमदारांना पुन्हा विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.
काँग्रेसची पहिली ४८ उमेदवारांची यादी खालीलप्रमाणेः-
अक्कलकुवा- के.सी पाडवी- आमदार
शहादा – राजेंद्रकुमार गावीत
नंदूरबार – किरण तडवी
नवापूर – शिरीषकुमार नाईक
साक्री – प्रवीण चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल पाटील-आमदार
रावेर -धनंजय चौधरी
मलकापूर – राजेश एकडे
चिखली – राहुल बोंद्रे-आमदार
रिसोड – अमित झनक-आमदार
धामणगाव रेल्वे – विरेंद्र जगताप
अमरावती – डॉ. सुनील देशमुख
तिवसा – यशोमती ठाकूर-आमदार
अचलपूर – अनिरुध्द देशमुख-आमदार
देवळी- रणजीत कांबळे-आमदार
नागपूर दक्षिण-पश्चिम – प्रफुल गुडदे
नागपूर मध्य – बंटी शेळके
नागपूर पश्चिम -विकास ठाकरे- आमदार
नागपूर उत्तर – नितीन राऊत-आमदार
साकोली – नाना पटोले-आमदार
गोंदिया – गोपालदास अगरवाल-
राजूरा -सुभाष धोटे- आमदार
ब्रम्हपुरी – विजय वडेट्टीवार-आमदार
चिमूर -सतीश वारजूकर
हदगाव- माधवराव पवार-पाटील
भोकर – तिरुपती कोंडेकर
नायगाव – मिनल पाटील खतगावकर
पाथरी – सुरेश वरपूडकर-
फुलंब्री – विलास औताडे-आमदार
मिरा-भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
मालाड पश्चिम – अस्लम शेख-आमदार
चांदिवली – नसीम खान
धारावी ( अ.जा) – डॉ. ज्योती गायकवाड
मुंबादेवी – अमीन पटेल-आमदार
परंदुर -संजय जगताप-आमदार
भोर -संग्राम थोपटे-आमदार
कसबा पेठ – रवींद्र धंगेकर-आमदार
संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात-आमदार
शिर्डी – प्रभावती घोगरे
लातूर ग्रामीण – धीरज देशमुख-आमदार
लातूर शहर – अमित देशमुख-आमदार
अक्कलकोट – सिद्धाराम म्हेत्रे
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण-आमदार
कोल्हापूर दक्षिण – ऋतुराज पाटील
करवीर – राहूल पाटील-आमदार
हातकलंगणे – राजू आवळे
पलूस -कडेगाव -विश्वजीत कदम-आमदार
जत – विक्रमसिंह सावंत
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीने दिलेल्या मान्यतेनुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – २०२४ साठी काँग्रेस पक्षाच्या ४८ अधिकृत उमेदवारांची विधानसभानिहाय पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. pic.twitter.com/C2fcIMyrJE
— Nana Patole (@NANA_PATOLE) October 24, 2024
Marathi e-Batmya