माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात धाव खंडणीचा गुन्हा रद्द करा

खंडणी, फौजदारी कट रचणे आणि बनावट कागदपत्राद्वारे फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणी माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. व्यावसायिक संजय पुनामिया यांनी राजकीय सूडबुद्धीने आपल्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवल्याचा दावाही पांडेनी याचिकेतून केला आहे.

संजय पांडे यांनी पोलीस महासंचालकपदाचा दुरूपयोग केला तसेच पैसे उकळून खोटी विधाने देण्यास भाग पाडल्याचा आरोप संजय पुनामिया यांनी केला होता. परंतु, तीन वर्षांच्या विलंबानंतर संजय पुनामियावनी पांडे यांच्याविरोधात तक्रार केली. तसेच, जून २०२२ मध्ये मुंबई पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यापासूनच संजय पांडे यांच्याविरोधात राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे, असा दावा संजय पांडे यांच्यावतीने सोमवारी न्या. भारती डांगरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणीदरम्यान केला.

संजय पुनमियाचे हे सराईत तक्रारकर्ते असून त्यांच्याविरोधातही अनेक गुन्हे दाखल असल्याचा दावा करून संजय पांडे यांनी संजय पुनामिया यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, संजय पुनामिया यांनी यापूर्वीही अशाच प्रकारची केलेली तक्रार फेटाळण्यात आल्याचेही संजय पांडे यांनी न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, त्यांच्याविरोधात ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची आणि तपासाला स्थगिती देण्याची मागणी संजय पांडे केली आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, संजय पांडेसह दोन सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि इतरांवर संजय पुनमिया यांना खोट्या प्रकरणांत गोवण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसेच, २०२१ मध्ये आपण सैफी रुग्णालयात दाखल असताना आपल्याला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे माजी पोलीस परमबीर सिंग यांना अडकवण्यासाठी संजय पांडेनी संदेश पाठवला होता. त्यास नकार दिल्यानंतर पोलीस महासंचालकपदी असलेल्या संजय पांडेनी धमकावल्याचा दावाही संजय पुनामिया यांनी केला होता.

About Editor

Check Also

अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती १८ मार्चपर्यंत राजपाल यादव यांच्या शिक्षेला स्थगिती

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी राजपाल यादव यांची चेक बाउन्स प्रकरणात शिक्षा स्थगित केली, ज्यामुळे त्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *