बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर स्थानिक पोलिस आणि प्रशासनाकडून घेतलेल्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर राजकिय पटलावर या प्रकरणाचे पडसाद उमटले. त्याचबरोबर बीडमधील सर्वपक्षियांनी संतोष देशमुख यांच्या मारकऱ्यांना अटक करावी म्हणून मोर्चाही काढण्यात आला. अखेर राजकिय पडसादाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणातील संशयतीत आरोपी वाल्मिक कराड हा सीआयडी समोर शरणागती पत्करली. त्यानंतर या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांकडून दिडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. तसेच या हत्या प्रकरणाशी संबधित २ कोटी रूपयांच्या खंडणीचा मुद्दाही मुळाशी आहे. या दोन्हींच्या अनुषंगाने सध्या तपास होत आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी तीन जणांना चौकशीसाठी सीआयडीने पाचारण केले. मात्र ते तिघे कोण अशी चर्चाही या निमित्ताने सुरु झाली आहे.
सीआयडी पोलिसांसमोर वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रकरणाच्या चौकशी साठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पोलिस तपास पथकात आयपीएस अधिकारी अधिकारी बसवराज तेली, पोलिस उपनिरिक्षक आर्थिक गुन्हे शाखा सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. तर बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकात उपनिरिक्षक अनिल गुजर, सहायक पोलिस निरिक्षक विजयसिंग जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अंहकारे, संतोष गित्ते या समावेश आहे.
Marathi e-Batmya