सोलापूरातील टॉवेल कारखान्याला लागलेली आग दहा तासानंतर आटोक्यातः आठ कामगारांचा मृत्यू संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आग आली आटोक्यात

सोलापूरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका टॉवेल कारखान्याला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या आगीच्या दुर्घटनेत एक महिला कामगाराचा समावेश असून एकूण आठ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर ३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. दुर्घटनेत कारखाना मालकाचे कुटुंबियासह आणि काही कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान ही आग इतकी मोठी होती की तब्बल १० तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्सटाईल नावाच्या कारख्यान्यात पहाटे पावणेचारच्या सुमारास अचानक आग लागली. आणि पाहता पाहता आग पसरली आणि आगीने रौद्र रूप धारण केले. यात बागवान कुटुंबियाची संबधित महिलेसह आठ कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत कारखान्याच्या मालकाचे कटुंबियही अडकले होते. हाजी मन्सुरी यांच्या मालकीच्या सेंट्रल टेक्सटाईल कारखान्यात सुमारे २२५ कामगार काम करत होते.

या आगीच्या दुर्घटनेत उत्पादीत टॉवेलसाठी लागणारे सूत, दोरी, रसायन, कागदी पुठ्ठे आदी माल मोठ्या प्रमाणावर होता. कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी यांचे कुटुंबिय कारखान्याच्या वरच्या मजल्यावर रहात होते. आगीच्या दुर्घटनेत मन्सुरी कुटुंबातील पाच ते सहा जण अडकले होते. त्यांच्या बचावासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न करण्यात येत होते.

यासंदर्भात सोलापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी राकेश साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पहाटे पावणे चारच्या सुमारास सेंटर टेक्सटाईल टॉवेल कारखान्यात आग लागल्याची खबर एमआयडीसी मधील महापालिकेच्या अग्निशमन दलास मिळाली. त्यांतर लगेच अग्निशमन दलाचा पाण्याचा बंब दुर्घटना स्थळी धावून गेला. परंतु आगीने रौद्र रूप धारण केले होते.

पुढे बोलताना राकेश साळुंखे म्हणाले, आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व केंद्रावरील पाण्याचे बंब मागविण्यात आले. तसेच एनपीटीसी प्रकल्पासह चिंचोली एमआयडीसी, अक्कलकोट व पंढरपूर येथूनही बंब मागविण्यात आले. सुमारे दहा बंबानी ६० पेक्षा जास्त फेऱ्या करत आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीचे रूप भीषण होते. तसेच कारखान्याच्या मोकळ्या आवारात पत्र्याचे शेड असल्याने पाण्याचा बंब आत पोहचण्यात अडचण येत होती. मात्र अडकलेल्या कुटुंबियांना वाचविण्यासाठी एरियल लॅडर आणि उंच शिडीचा वापर करण्यात आला.

दरम्यान भाजपा आमदार सुभाषबापू देशमुख आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. तसेच आगीच्या दुर्घटनेवेळी पाण्याचे बंब उशीरा पोहचल्याबाबत तक्रार केली. त्यावर राकेश साळुंखे यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

About Editor

Check Also

भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न शासकीय खरेदी प्रक्रिया आणि गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस चे महत्व याविषयी मार्गदर्शन

भारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने विविध विषयांवर  एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *