झारखंडचे माजी मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास

झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शिबू सोरेने यांचे वय ८१ वर्षे होते.  मागील काही दिवसांपासून शिबू सोरेन यांना किडनीशी संबधित आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच आज शिबू सोरेन यांची प्राण ज्योत मालवली. त्यांचे पुत्र, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सX द्वारे शिबू सोरेन यांच्या निधनाची घोषणा केली.

लोकसभा आणि राज्यसभेतील लोकप्रतिनिधी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांनी नवी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाला भेट दिली आणि शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी त्यांचे पुत्र झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही सर गंगाराम रुग्णालयाला भेट दिली आणि शिबू सोरेन यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली. भेट घेत शिबू सोरेन यांना श्रद्धांजली वाहिली.

किडनीशी संबंधित समस्येमुळे सोरेन यांना एका महिन्याहून अधिक काळ राष्ट्रीय राजधानीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

८१ वर्षीय नेते गेल्या ३८ वर्षांपासून झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते होते आणि पक्षाचे संस्थापक संरक्षक म्हणून ओळखले जातात.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे वडील शिबू सोरेन यांना भावनिक श्रद्धांजली वाहताना झामुमो संस्थापकांना आदिवासी आणि राज्यासाठी संरक्षक सावली म्हणून वर्णन केले आणि त्यांचा वारसा जिवंत राहील अशी ग्वाही दिली.

झामुमो पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वडिल शिबू सोरेन यांचे कौतुक करत घोषणाबाजी केल्याने हेमंत सोरेन हे भावूक झाले. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वडिलांचे वर्णन “महान पुरुष” असे केले.

झारखंडच्या माजी मुख्यमंत्र्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी दिल्लीहून रांचीला नेण्यात येणार आहे.

मृत्यूची बातमी समजताच सोमवारी रांची येथील झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांनी शिबू सोरेन यांना मूक श्रद्धांजली वाहिली.

पक्षाच्या संरक्षकाच्या सन्मानार्थ कार्यालयात पक्षाचा ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात आला. वेगळ्या झारखंड राज्याच्या निर्मितीतील त्यांच्या योगदानाबद्दल आणि सावकारांविरुद्धच्या त्यांच्या लढाईबद्दल पक्षाचे सदस्य चर्चा करताना दिसले.

“‘गुरुजी’ यांचे पार्थिव सायंकाळी ५.३० वाजता रांचीला आणले जाईल. सोमवारी मोराबाडी परिसरातील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. मंगळवारी सकाळी ते रामगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी नेमरा येथे नेले जाईल, जिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील,” असे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सुप्रियो भट्टाचार्य यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) चे संस्थापक शिबू सोरेन यांच्या निधनानंतर झारखंड विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारी अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आल्याची घोषणा सभापती रवींद्र नाथ महातो यांनी केली. विधानसभेचे अधिवेशन शुक्रवार, १ ऑगस्टपासून सुरू झाले होते.

सभा अनिश्चित काळासाठी तहकूब करताना विधानसभा अध्यक्ष रवींद्र नाथ महातो म्हणाले, “दिशोम गुरु शिबू सोरेन आज स्वर्गवासी झाले… त्यांचे निधन केवळ झारखंडचेच नाही तर देशाचेही अपरमीत नुकसान झाले आहे… ते गरिबांसाठीच्या लढ्यासाठी ओळखले जात होते…” सभागृहाचे कामकाज सुरू होताच आमदारांनी ‘शिबू सोरेन अमर रहे’ अशा घोषणा दिल्या.

About Editor

Check Also

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची मुंबईत भेट भारत-फ्रान्स व्यावसायिक संबध वृद्धींगत करण्याच्या अनुषंगाने चर्चा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१६ फेब्रुवारी २०२६) मुंबईत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *