कर्नाटकाच्या विधिमंडळात आरएसएसचे गीत, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची माफी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आरएसएसचे गीत

गेल्या आठवड्यात राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे गीत नमस्ते सदा वत्सले मातृभूमे गाऊन वाद निर्माण करणारे केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी २६ ऑगस्ट रोजी ‘काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत’ त्यांची माफी मागितली.

१९८० पासून काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंबाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा पुनरुच्चार करताना डी के शिवकुमार म्हणाले, माझ्या हायकमांडमधील कोणीही मला माफी मागण्यास सांगितले नाही.

४ जून रोजी बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या समारंभात एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवर विरोधी पक्ष भाजपाने उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान, डी के शिवकुमार यांनी आरएसएसच्या प्रार्थनेचा एक भाग गायला होता, ज्यामध्ये त्यांनी ‘त्यांना (भाजपला) पाय खेचण्याचा प्रयत्न केला आहे. माझे काही मित्र त्यातून राजकीय मतितार्थ काढतात, त्याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात आणि जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करतात. माझा हेतू आरएसएसची प्रशंसा करण्याचा नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

डी के शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस आणि गांधी कुटुंबावरील माझ्या निष्ठेवर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. मी काँग्रेसी म्हणून जन्मलो आणि काँग्रेसी म्हणून मरेन, असेही यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

“राजकारणात येण्यापूर्वी आणि एनएसयूआयमध्ये सामील होण्यापूर्वी,” ते म्हणाले, “मी एनएसयूआय, काँग्रेस, गांधी कुटुंब, गांधी कुटुंबाचे योगदान, काँग्रेसचा इतिहास, आरएसएस, भाजपा, जेडी(एस), कम्युनिस्ट पक्ष आणि देशातील विविध राजकीय पक्षांचा इतिहास याबद्दल अभ्यास केला.”

ईडीने दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीतील तिहार तुरुंगात झालेल्या त्यांच्या तुरुंगवासाची आठवण करून देताना डी के शिवकुमार म्हणाले, जर कोणाला माझा इतिहास जाणून घ्यायचा असेल, माझी वचनबद्धता जाणून घ्यायची असेल, माझी विचारसरणी जाणून घ्यायची असेल आणि त्यांना त्यावर राजकारण करायचे असेल, तर ते त्यांच्यावर सोपवले आहे. मी त्यावर भाष्य करू इच्छित नाही असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार म्हणाले की, पण जर कोणी दुखावले असेल, तर माझ्या पक्षातील काही सहकारी त्यावर भाष्य करत असतील, माझे खूप कार्यकर्त्ये आहेत… जर कोणी कोणाला दुखावले असेल, तर मी त्यांच्या भावना दुखावू इच्छित नाही, मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते. मी त्यांची माफी मागू इच्छितो असे सांगितले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद, एमएलसी यांची डि के शिवकुमार यांच्याकडून माफी मागितली तर माजी मंत्री के. एन. राजन्ना यांनी अलिकडच्या काळात उपमुख्यमंत्र्यांच्या कृतींवर टीका केली, ज्यामध्ये ईशा फाउंडेशनने आयोजित महाशिवरात्री उत्सवादरम्यान कोइम्बतूर (तामिळनाडू) येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत स्टेज शेअर केले होते.

About Editor

Check Also

८० व्या स्वांतत्र दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, सिंधू पाणी करार निलंबित करणे राष्ट्र हिताचे शेतकऱ्यांसाठी निर्णयक पाऊल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना, “दहशतवादाला आश्रय देणाऱ्या” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *