ओम बिर्ला यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, विरोधी पक्षनेता सभागृहाच्या वर नाही लोकसभा अध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव जिंकल्यावर केली टीका

विरोधी पक्षाचा अविश्वास ठराव सभागृहात पराभूत झाल्यानंतर गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा काम सुरू करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपली कृती निःपक्षपाती असल्याचे सांगत आपल्या पहिल्याच भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, प्रत्येक खासदाराला लोकसभेत बोलता यावे यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, तसेच विरोधी पक्षनेता “सदनाच्या वर” नसल्याचे स्पष्ट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली.

राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ओम बिर्ला म्हणाले की, “काही सदस्यांचे मत होते की विरोधी पक्षनेता सभागृहाच्या वर असतो आणि कोणत्याही विषयावर बोलू शकतो. तथापि, कोणालाही अशा प्रकारचा विशेषाधिकार नाही. सभागृह त्याच्या नियमांनुसार चालते,” असेही सांगितले.

ओम बिर्ला म्हणाले की, “पंतप्रधान आणि मंत्र्यांनाही विधान करण्यासाठी सभागृहाच्या नियमांनुसार सूचना द्याव्या लागतात,” असे यावेळी स्पष्ट केले.

बुधवारी, लोकसभेत १२ तासांच्या वादविवादात विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध आणलेला अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. या चर्चेत गोंधळ झाला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसने अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न देण्याचा आरोप वारंवार केला. फेब्रुवारीमध्ये, विरोधी पक्षनेत्याला माजी लष्करप्रमुख एम एम नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्राबद्दल लोकसभेत बोलण्यापासून रोखण्यात आले, ज्यामुळे मोठा गोंधळ झाला होता.

काँग्रेसच्या आठ खासदारांच्या निलंबनामुळे तणाव वाढला, ज्यामुळे विरोधकांनी अध्यक्षांना काढून टाकण्याची मागणी करणारा अविश्वास ठरावाची सूचना सादर केली. या सूचनेवर ११८ खासदारांनी स्वाक्षरी केली.

त्यांनी पक्षपाती पद्धतीने काम केल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळून लावत ओम बिर्ला म्हणाले, “मी नेहमीच निःपक्षपातीपणे, शिस्तबद्धतेने, संतुलितपणे आणि नियमांनुसार सभागृहाचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न केला आहे.”

भावनिक भाषणात ओम बिर्ला म्हणाले की, त्यांनी सभागृहातील खासदारांचे मायक्रोफोन नियंत्रित केल्याचे आरोप निराधार आहेत. सभापतींनी अधोरेखित केले की, त्यांच्याकडे माइक नियंत्रित करण्यासाठी “स्विच” नाही आणि प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली.

“अध्यक्षांकडे कधीही मायक्रोफोन चालू किंवा बंद करण्यासाठी बटण नसते… जेव्हा विरोधी सदस्य अध्यक्ष म्हणून काम करतात तेव्हा त्यांना देखील या वस्तुस्थितीची पूर्ण जाणीव असते. ज्या सदस्याला बोलण्याची परवानगी आहे त्याच्यासाठीच मायक्रोफोन चालू असतो. फक्त त्या सदस्याचा मायक्रोफोन सक्रिय असतो,” बिर्ला म्हणाले.

त्यांचे भाषण संपवण्यापूर्वी, ओम बिर्ला म्हणाले की, त्यांनी नेहमीच सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्यास कचरणाऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे.

ओम बिर्ला म्हणाले की, “स्वतंत्र भारताच्या इतिहासात तिसऱ्यांदा लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. मी नेहमीच सभागृहातील प्रत्येक सदस्याने नियम आणि कार्यपद्धतींमधील मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करावे याची खात्री करण्याचा प्रयत्न केला,” असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

इराणच्या विरोधातील संघर्षामुळे कच्चा तेलाच्या प्रति बॅरलची किंमत ११० डॉलर्सपेक्षा जास्त परिणामतः घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या विरोधात संघर्षामुळे तेलाच्या बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला आणि जगातील सर्वात महत्त्वाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *