पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळून कोट्यवधी रुपयांचा लाभ सरकारमध्ये बसलेल्या काही लाभार्थ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना झाला पण त्यामुळे देशातील लाखो वाहनधारकांना नाहक त्रास होत आहे. वाहनात अनेक बिघाड झाले, हे एक मोठे स्कॅम असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत. इथेनॉल घोटाळ्याप्रश्नी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजानीमा घ्यावा अशी, मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, ई-२० चा निर्णय २०३० ला लागू होणे अपेक्षित होते पण मोदी सरकारमधील काही हितसंबंधित लोकांना लाभ मिळावा यासाठी घाईगडबडीत हा निर्णय लादण्यात आला. इथेनॉलऐवजी पेट्रोलमध्ये पाणी मिसळल्याच्या मोठ्या तक्रारी पुढे येत आहेत. आखातातील इंधन तुटवड्याचा फायदा उचलण्यासाठी मोठा घोटाळा केल्या, त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. नितीन गडकरी यांच्या हट्टामुळे अनेक वाहनं बंद पडली, इथेनॉलची वकिली करणारी व्यक्ती नितीन गडकरीच आहेत तसेच या घोटाळ्यात अनेक दलालही आहेत, त्यांचाही लवकरच पर्दाफाश होईल. पेट्रोलच्या किंमतीत पाणी विकून लोकांनी मोठी फसवणूक केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही केली.
आरएसएस RSS चा अजेंडा राबवण्यासाठी फडणवीस दिल्लीला!
देवेंद्र फडणवीस यांच्याबदद्ल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवण्याचे कारस्थान सुरु आहे, आणि त्यांनाही दिल्लीत जाण्याची घाई झालेली आहे. हिंदी लादण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग होता. महायुती सरकारमध्ये त्यांची विकेट काडण्यासाठीही प्रयत्न सुरु आहेत. खरे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अमित शाह आहेत, फडणवीस शॅडो मुख्यमंत्री आहेत. भाजपा आरएसएसलाही त्यांचा अजेंडा राबवण्यासाठी रेशीम बागेचा खास माणूस हवा आहे व ते फडणवीस आहेत. मनुस्मृतीतील श्लोक टाकणे, चार्तुवर्ण व्यवस्था पुन्हा आणणे, संविधान व शिक्षणव्यवस्था बदलण्यासाठी फडणवीस हेच योग्य व्यक्ती आहेत, म्हणून दिल्लीत त्यांना शिक्षणमंत्री बनवण्याचा घाट घातला जात आहे, असेही म्हणाले.
Marathi e-Batmya