कृषी

कृषी योजनांचा लाभ घ्यायचाय मग या तारखेपर्यत अर्ज करा महाडीबीटी पोर्टलवर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर माहितीसह अर्ज ३१ डिसेंबर पर्यंत सादर करावेत. या तारखेपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली …

Read More »

कापसाच्या खरेदी-विक्रीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ॲप नवीन ३० कापूस खरेदी केंद्र नियोजित- पणन मंत्री बाळासाहेब पाटील

मुंबई : प्रतिनिधी सन २०२०-२१ मधील हमी दरावरील कापूस खरेदी-परतावा आणि कापूस लागवडीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर जिल्ह्यातील एका केंद्राची निवड करून ॲपद्वारे त्यांची इत्यंभुत माहिती अद्ययावत करावी. जेणेकरून शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील …

Read More »

भारत बंद आंदोलनात हे ११ राजकिय पक्ष होणार सहभागी संयुक्त निवेदन जाहीर

मुंबई : प्रतिनिधी चर्चेविना केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंदची हाक दिली. त्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातील ११ राजकिय पक्षांनी पाठिंबा देत त्यात सहभागी होणार असल्याचे संयुक्त पत्रकही काढण्यात आले. या भारत बंद आंदोलनात काँग्रेसने सक्रिय सहभाग घेणार असल्याचे …

Read More »

प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीनच्या सुपिकतेचा फलक लावणे बंधनकारक 5 डिसेंबरला जागतिक मृद दिनी गावांमध्ये कार्यशाळा घेण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतीक मृददिनानिमित्त प्रत्येक गावात कार्यशाळा आयोजित करण्यात यावी, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले. ग्रामपंचायत स्तरावर …

Read More »

राज्यात पहिल्यांदाच माशाच्या कातडीपासून वस्तू बनविणाऱ्यांसाठी फिश-ओ-क्राफ्ट कौशल्य विकास दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

मुंबई : प्रतिनिधी मत्स्य कातडीपासून वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत असून फिश- ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती …

Read More »

शेतकऱ्यांच्या आंदोलनात आता महाराष्ट्रही सहभागी होणार ३ डिसेंबर रोजी राज्यव्यापी एल्गार किसान संघर्ष समन्वय समितीच्या ऑनलाईन बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत …

Read More »

राज्यातील धान उत्पादकांना प्रति क्विंटल ७०० रूपये अतिरिक्त देणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा ७०० रूपये अतिरिक्त देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर धान उपादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार जो हमीभाव देईल त्यापेक्षा जास्त भाव राज्य सरकारकडून देण्यात …

Read More »

एक लाख कृषीपंप जोडण्या देत ग्रामीण भागातील या संस्थाकडून होणार बिलाची वसुली नवीन धोरण जाहीर- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कृषी ग्राहकांची थकबाकी वसूल करण्याकरिता ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचत गट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषीपंपांची पाच वर्षापुर्वीची व पाच वर्षापर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे. सदर  थकबाकीची रक्कम ३ वर्षात भरण्याची मुभा असणार आहे. पहिल्या वर्षी भरलेल्या रकमेवर …

Read More »

पशुंना वेळेत उपचार उपलब्ध करून देण्यासाठी मध्यवर्ती कॉल सेंटर १०८ या टोल फ्री प्रमाणे मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेसाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक प्रस्तावित

मुंबई : प्रतिनिधी पशुपालकांच्या दारापर्यंत पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभावी संनियंत्रणासाठी पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे येथे मध्यवर्ती कॉल सेंटरच्या स्थापनेसाठी इंडसइंड बँक यांची उपकंपनी असलेली भारत फायनांस इन्क्लुजन लिमिटेड या कंपनीसोबत मंत्रालयात सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व …

Read More »

रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृषि विद्यापीठांमार्फत नव्याने संशोधित केलेल्या सुधारीत व संकरीत वाणांच्या प्रसारासाठी कृषि विभागामार्फत रब्बी हंगामासाठी ३ लाख १४ हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येणार असून त्यासाठी ६२.७९ कोटीची तरतूद करण्यात आली आहे, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. राज्यात चालु वर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने रब्बी हंगामासाठी …

Read More »