कृषी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा आणि नुकसानीची भरपाई मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर माहिती

मुंबईः प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगत पुढील २ ते ३ दिवसात नुकसान भरपाई देण्याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. …

Read More »

शेतकर्‍यांना उभे करण्यासाठी हातभार लावा अन्यथा …. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा इशारा

नाशिक: प्रतिनिधी शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आज नाशिकमध्ये शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर जात त्यांच्या पिकाची पाहणी केली. शेतकर्‍यांच्या झालेल्या …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी घेतला अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीचा आढावा मंत्रिमंडळ उपसमितीची शनिवारी होणार बैठक

मुंबई: प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि शासनाच्यावतीने करण्यात …

Read More »

जगावं की मरावं ? शेतक-यांनी मांडली शरद पवारांसमोर व्यथा पावसामुळे शेतकरी हवालदिल

नाशिकः प्रतिनिधी आमच्या हातचं पीक गेलंय… खूप नुकसान झालंय… जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असे सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना शेतकऱ्यांनी कथन केली. परतीच्या पावसामुळे राज्यात शेतीचे खूप नुकसान झाले आहे. आज इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांना राष्ट्रवादी …

Read More »

छ.शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेपासून ५० टक्के शेतकरी वंचित एकवेळ समझोता योजना म्हणजे धुळफेक असल्याचा काँग्रेस प्रवक्ते सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची देशातील सर्वात मोठी कर्जमाफी हा भाजप शिवसेना सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असून या कर्जमाफीतून ५० टक्के शेतकरी वंचित राहिल्याने शेतक-यांना न्याय देण्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. छत्रपती …

Read More »

“कृषी संवाद” च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मंत्र्याकडे मांडता येणार प्रश्न उपक्रमाचा कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते शुमारंभ

मुंबई : प्रतिनिधी एकाच वेळी राज्यातील १० हजार शेतकऱ्यांशी संवाद साधता येणाऱ्या “कृषी संवाद” या उपक्रमाचा शुभारंभ आज कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला. यावेळी अमरावतीसह सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांशी कृषीमंत्र्यांनी संवाद साधला.या उपक्रमाच्या माध्यमातून कृषी मंत्री शेतकऱ्यांसोबतच कृषीमित्र, कृषी सहाय्यक यांच्याशी विविध बाबींवर संवाद साधणार आहेत. …

Read More »

बनावट खते, कीटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठी बनावट खते, कीटकनाशके व बी-बीयाणे नियंत्रण संदर्भातील कायदा अधिक कडक करून त्याचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेते व उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच नमुना तपासणीमध्ये वारंवार बनावट व निकृष्ट दर्जाची खते, कीटकनाशके विक्री करत असल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करून परवाने रद्द करण्यात यावेत असे निर्देश देऊन …

Read More »

अशोक चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणतात शिबीरे घ्या पीक विम्याच्या तक्रार निवारणासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून पीक विमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड …

Read More »

पीक विमा भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्या धानाची रोपे (पऱ्हे) टाकल्यापासूनच पिक विमा लागू करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगामातील पिक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागात कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा …

Read More »

कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षातील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना …

Read More »