Editor

सरकारी कर्मचाऱ्यांची चंगळः ईद ए मिलाद सणाची गुरूवारची सुट्टी शुक्रवारी सलग पाच दिवस सुट्टी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार २८ तारखेला आले आहेत. त्यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस सरकारी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र सामाजिक सलोखा राखण्याच्या नादात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, शासन जनतेच्या दारी तर मग जनता शासनाच्या दारी का ? मंत्रालयात येण्यापासून सर्वसामान्यांना रोखणे ही हुकुमशाही

राज्यातील शिंदे सरकारला केंद्रातील भाजपा सरकारच्या हुकूमशाही कारभाराची लागण झालेली आहे. केंद्र सरकार मुठभर लोकांसाठी काम करते तसेच राज्य सरकारही काम करत आहे. सरकार सामान्य जनतेची कामे करण्यासाठी आहे, मुठभर लोकांसाठी नाही. आपले काम स्थानिक पातळीवर होत नाही म्हणूनच लोक मंत्रालयात येत असतात. मंत्रालयात दलालांना मुक्त वावर आहे आणि सुरक्षेचे …

Read More »

रायगड जिल्ह्यातील माणगाव विभागीय क्रीडा संकुलाला मंजुरी आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांनुसार आराखडा तयार करावा- उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, रायगड जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा रसिकांसाठी माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल सोयीचे ठरणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार असावे आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल,… पंतप्रधान मोदी नक्षलवाद्यांचे पंतप्रधान आहेत का? मोदी सरकारची धोरणे, योजना ह्या मित्रों व अदानीच ठरवतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर टीका करताना सर्व पातळी सोडली आहे.काँग्रेस पक्ष नक्षलवादी चालवतात हा मोदींचा आरोप बालिश आणि अत्यंत हास्यास्पद आहे. तसेच पंतप्रधानपदावरील व्यक्तीला ते शोभणारे नाही. मोदींनी याआधी दलितांना नक्षलवादी म्हटले, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या देशातील शेतकऱ्यांनाही आतंकवादी, खलिस्तानी, नक्षलवादी म्हणून अपमानित केले होते. ८० कोटी अन्नदात्यांनी …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, पंतप्रधान मोदींची टीका चुकीची पंतप्रधान मोदींचं वक्तव्य क्लेशदायक

२१ सप्टेंबरला महिला आरक्षणाच्या विधेयकाला दोन सदस्य सोडले तर कोणीही विरोध केला नाही. एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी नाईलाजाने पाठिंबा दिला, ही पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका चुकीची आहे. महिला आरक्षणावर आधी देखील विचार झालेला आहे. पंतप्रधानांनाचे ते वक्तव्य क्लेषदायक आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

मंत्रालयातल्या संरक्षक जाळीवर तरुण कंत्राटी शिक्षकाचे आंदोलन भरतीची प्रक्रिया सुरु करण्याची मागणी

मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जमली गावातील कंत्राटी शिक्षक रणजित बाबासाहेब आव्हाड याने उडी मारून आंदोलन केले. हा तरुण धरणग्रस्त असून सरकार कडून त्याला अद्याप नोकरी दिली गेली नाही. त्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. मात्र त्याला जाळीवरून बाहेर काढताना सुरक्षा रक्षकांची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे यावेळी …

Read More »

आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर राजभवन येथे कुलगुरुंची परिषद कुलगुरूंनी आदिवासी गावांमध्ये जाऊन आदिवासींच्या समस्या जाणून घ्याव्यात- राज्यपालांच्या कुलगुरुंना सूचना

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची सकल नोंदणी सन २०३५ पर्यंत ५० टक्के इतकी आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आज राज्यातील उच्च शिक्षणातील सकल नोंदणी ३२ इतकी आहे. मात्र, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हे प्रमाण १४ टक्के आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील ड्रॉप आऊट दर जास्त आहे. हे चित्र …

Read More »

राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ ऑक्टोबरला ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास’ उपक्रम- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवडा अंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा राबविण्यात येणार असून लोकसहभागातून …

Read More »

काँग्रेसची मागणी, अंधेरीतील सेव्हन सिल्स हॉस्पिटल ताब्यात घ्या सेव्हन हिल्सच्या जागेत मेडिकल व नर्सिंग कॉलेजसह अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्याची संधी

अंधेरी येथील अत्याधुनिक सेव्हन हिल्स हॉस्पिटल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शहराच्या मोक्याच्या जागी १६ एकर जागेवर असलेल्या १५०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आहेत. हॉस्पिटल सध्या दिवाळखोरीत निघालेले असल्याने ते ताब्यात घेऊन ‘एम्स’सारखे हॉस्पिटल येथे सुरु करता येणे शक्य आहे. मुंबई व महाराष्ट्राच्या जनतेला उत्तम आरोग्य …

Read More »

कांद्याचा वांदा वाढलाः अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही बैठक पार पडली पण निर्णय झाला नाही

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कांदाप्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीतूनच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दूरध्वनी केला. पियुष गोयल यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या दूरध्वनीला प्रतिसाद देत आजच संध्याकाळी (२६ सप्टेंबर) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, …

Read More »