Editor

शेअर बाजार तेजीत सेन्सेक्स : २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद

जागतिक बाजारपेठेत तेजीमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजारातही तेजी दिसून आली. आयटी आणि कमोडिटी शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने शेअर बाजार वधारून बंद झाले. सेन्सेक्स २४० अंकांच्या वाढीसह ६५,६२८ वर बंद झाला. तर निफ्टी ९३ अंकांनी वाढून १९,५२८ वर स्थिरावला. सेन्सेक्सध्ये कोल इंडियाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ४.६४ टक्के वाढ झाली …

Read More »

एकल नव्हे एकत्रित कुटुंब हवे! कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचा ५ वा वर्धापनदिन उत्सहात साजरा

अंतर्गत मतभेदामुळे सध्या एकल कुटुंब पद्धत वाढल्याने जनरेशन गॅप वाढत आहे. परंतु मुलांची जडण- घडण, त्यांच्यावर संस्कार होण्यास एकत्रित कुटुंब पद्धत गरजेची असल्याचे प्रतिपादन कोकण विभाग म्हादे परिवार संलग्न कोकणस्थ म्हादे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रदिप म्हादे यांनी केले. रविवारी संस्थेचा पाचवा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा दिवा येथील शिवलिला अपार्टमेंट मोठ्या …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, राज्यात तीन जनरल डायर मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या हल्यावरून संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर टीकास्त्र

जालन्यातील अंबड तालुक्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात अनेक निष्पाप नागरिक गंभीररित्या जखमी झाले. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर ठिकाणी भेट देण्याचे सोडा तेथील घटनेची माहिती घेण्याचेही टाळले. त्यातच पोलिसांना मुंबईतून फोन …

Read More »

राज्यकर विभागाची अभय योजना २०२३ जीएसटी पूर्व कायद्यांमधील निर्धारणेचे काम आता बहुतांशी संपलेले

राज्य शासनाने व्यापाऱ्यांच्या जुन्या थकबाकीच्या परतफेडीसाठी मागील वर्षी २०२२ अधिनियम क्र.२९ द्वारा जीएसटी पूर्वीच्या कायद्यासाठी अभय योजना जाहीर केली होती. तिचे सर्व स्तरांतुन उस्फुर्त स्वागत झाले, कारण व्यापा-यांसाठी ही योजना उपयुक्त ठरली होती. जीएसटी पूर्व कायद्यांमधील निर्धारणेचे काम आता बहुतांशी संपलेले असले, तरी थकबाकी अजूनही आहे. या पार्श्वभूमीवरच राज्य सरकारने …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करतात राज्यातील तिघाडी सरकारकडून मराठा आरक्षणप्रश्नी वेळकाढूपणा

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच चिघळवला आहे. भाजपा आरक्षण विरोधी पक्ष आहे त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचेच नाही. केंद्रात ९ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे पण त्यांनी निर्णय घेतला नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपाची प्रामाणिक इच्छा असेल तर संसदेच्या विशेष अधिवेशनातच मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय …

Read More »

मराठा आंदोलनात घडलयं ते दुर्दैवी; त्याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मागणी

मराठा आंदोलनाच्या वेळी जालना येथे जो लाठीचार्ज झाला तो दुर्दैवी आहे, याची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी असं भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या शिव-शक्ती परिक्रमेला सुरवात करण्यापूर्वी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना बोलत होत्या. मराठा आरक्षणाचा विषय संवेदनशीलपणे हाताळला जावा. तसेच पुढे बोलताना पंकजा मुंडे …

Read More »

पीएम किसानचा लाभ वडील आणि मुलाला एकत्र मिळणार? हा आहे नियम केंद्र सरकारचा नवा नियम

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात.ही रक्कम शेतकऱ्यांना तीन हप्त्यात दिली जाते. शेतकऱ्यांना एका हप्त्यात २,००० रुपये मिळतात.नुकताच या योजनेचा १४ वा हप्ता देण्यात आला आहे. आता शेतकरी १५ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा लाभ …

Read More »

हे काम लवकर न केल्यास पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खाते होईल निष्क्रीय, जाणून घ्या तपशील वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या गोष्टी करणे आवश्यक

तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही छोट्या बचत योजनेत गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वित्त मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर कोणत्याही लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांना त्यांचा आधार क्रमांक पोस्ट ऑफिस किंवा बँकेत …

Read More »

आयपीओ गुंतवणुकदारांसाठी कमाईची संधी या आठवड्यात ४ आयपीओ उघडणार

या आठवड्यात आयपीओ गुंतवणुकदारांसाठी मोठी कमाईची संधी आहे. चालू आठवड्यात चार आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडत आहेत. यामध्ये रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड, ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स लिमिटेड, ईएमएस लिमिटेड आणि कहन पॅकेजिंग या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या आयपीओबद्दल जाणून घेऊया. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग आयपीओ रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेडचा आयपीओ ४ सप्टेंबरपासून …

Read More »

तामीळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, दिवट्या… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑफिशियल एक्स एकाऊंटवरून ट्विट

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली असल्याची टीका राज्याचे …

Read More »