राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पंचायती राज संस्थांना सक्षम करून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत दिशादर्शक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान …
Read More »आदिवासींनी उच्च शिक्षणासाठी योजनांचा लाभ घ्यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या सहाय्याने सर्वांनी काम करणे गरजेचे आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुरू केलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना नमन करून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी …
Read More »नाना पटोले यांची खोचक टीका…शरद पवारांची बदनामी आणि त्यांचा पक्ष फोडण्याचे पाप मोदींचेच काँग्रेसवर घराणेशाहीचे आरोप करणाऱ्या नरेंद्र मोदींनी भाजपातील घराणेशाहीचा अभ्यास करावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीमुळे पंतप्रधानपद मिळाले नाही हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत बालीश व हास्यास्पद आहे. काँग्रेस पक्षात नेहमीच सर्वांना संधी दिली जाते. शरद पवारांनाही काँग्रेसने आमदार, खासदार, मुख्यमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्षनेता, संरक्षणमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री अशा विविध पदांची जबाबदारी दिली. पण त्याच शरद पवारांच्या …
Read More »परराज्यात गेलेल्या प्रकल्पांबाबतच्या श्वेतपत्रिकेबाबत उत्तर द्या भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान
फॉक्सकॉन, एअरबस ,सॅफ्रन, बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीने द्यावे असे आव्हान भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भांडारी बोलत होते. यावेळी माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन,सह-मुख्य …
Read More »बिहार राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करा ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांची राज्य सरकारकडे मागणी
देशात ओबीसीला आरक्षण १९९० पासून बी.पी. मंडल आयोगामुळे लागू करण्यात आले. भाजपा सरकारने आरएसएसच्या मनुवादी संस्कृतीच्या दबाव तंत्रामुळे ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मोहीम आखल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी जनगणना करण्यात आली. त्यामध्ये ओबीसीचा डाटा देण्यासंदर्भात वेळ काढून धोरण …
Read More »… देशाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
“देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे काम करीत आहोत. स्वराज्याचा हुंकार या महाराष्ट्राच्या मातीतून उमटला, त्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ऑगस्ट क्रांती मैदान …
Read More »राहुल गांधी यांनी भाजपा महिला खासदारांना पाहुन केले फ्लाईंग किस? वाचा नेमकं काय घडलं राहुल गांधी यांच्या भाषणामुळे चिडलेल्या भाजपा महिला खासदारांच दावा
मोदी आडनाव बदनामी प्रकणावरील गुजरात न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या शिक्षेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी परत मिळाली. त्यानंतर राहुल गांधी आज ९ ऑगस्ट रोजी लोकसभेतही परतले. लोकसभेत परतल्यावर अविश्वासदर्शक ठरावावर आपले मत व्यक्त करताना केलेल्या पहिल्याच भाषणात राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला …
Read More »राहुल गांधी यांचा मोदींसह भाजपावर निशाणा; भारताचे तुकडे करताय, मणिपूरमधील आईला मारलत… अविश्वास ठरावावरून राहुल गांधी यांची मोदी यांना रावणची उपमा
मणिपूरमधील हिंसाचार काही केल्या कमी व्हायला तयार नाही. या प्रश्नावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे विरोधकांनी याप्रश्नावर चर्चेची मागणी करत सत्ताधारी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव संसदेच्या लोकसभेत आणला. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर ताशेरे ओढत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुनावलेल्या …
Read More »‘माझी माती, माझा देश’ अभियानास सुरुवात मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, ०९ ऑगस्ट, २०२३ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी १० वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …
Read More »महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे
शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा …
Read More »
Marathi e-Batmya