Editor

मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रतिपादन, वंदे भारत एक्सप्रेसमुळे कोकण पर्यटनाला चालना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मडगाव - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत

मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर – दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी मडगाव ते मुंबईदरम्यान धावणाऱ्या वंदेभारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्यानंतर काल सायंकाळी …

Read More »

महाराष्ट्राला विविध श्रेणीत ५ पुरस्कार शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी

महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण ५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ (Government e Marketplace (GeM)) ला प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार २०२३’ प्रदान सोहळयाचे आयोजन सोमवारी सायंकाळी करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री …

Read More »

नाना पटोले म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपावर ६ तारखेला काँग्रेसची बैठक तर अधिवेशनाआधी… शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित

राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महा हब’ साकारणार ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी

राज्यातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महा हब’ ठाणे कल्याण येथील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांची तत्वतः मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आज मंत्रालयात महा हब संदर्भातील बैठक पार पडली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान …

Read More »

११ वी प्रवेशासाठी आवश्यक असणारी ‘ही’ कागदपत्रे सादर करण्यास तीन महिन्याची मुदतवाढ

विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले व पर्यायाने उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र तसेच ईडब्ल्युएस प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्याची बाब विचारात घेवून इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून पोहोच पावती किंवा हमीपत्र घेऊन तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, … संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ?

मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या …

Read More »

शरद पवार यांनी उघडकीला आणले पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यातील खोटे आरोप

पंतप्रधान मोदी यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आज भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना दृकश्राव्य पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच विरोधकांच्या झालेल्या बैठकीचा संदर्भावरून विरोधांवर टीका करताना शरद पवार यांच्यावर तसंच महाराष्ट्रातील विविध घोटाळ्यांचा संदर्भ देत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, वेगाने वाढणाऱ्या भारतीय अर्थ व्यवस्थेची माहिती पोहोचवा

मोदी सरकारच्या ‘गरीब कल्याण’ कार्यक्रमातून गरीबांचे उंचावलेले जीवनमान, सर्वसमावेशक विकासामुळे जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी भारताची अर्थव्यवस्था याची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सामान्य माणसांपर्यंत घरोघरी जाऊन पोहचविली पाहिजे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. भोपाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १० लाख बूथ वरील कार्यकर्त्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका, शरद पवार यांच्या मुलीचे भले करायचे असेल तर राष्ट्रवादीला मत द्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून पहिल्यादाच शरद पवारांचे नाव घेत साधला निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमात त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना अंगणवाडी शाळांमध्ये खजूर आणि इतर फळं वाटण्याचाही सल्ला दिला. मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं …

Read More »

भरदिवसा पुण्यात मुलीवर तरूणाचा कोयत्याने हल्ला सदाशिव पेठेतील घटना घडली, सुदैवाने तरूणीचे प्राण वाचले, दोन तरूणांनी हल्लेखोराला पकडले

काही दिवसांपूर्वी दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणीची राजगडाच्या पायथ्याशी हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना काही दिवस उलटत नाही तोच पुण्यात अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या …

Read More »