Editor

बारसूत उध्दव ठाकरे यांचा सवाल, मी पत्र दिल्याचे नाचविता….मग त्यावेळी शेपुट घालुन का बसले ? मिंद्याच्या सांगण्यावरूनच बारसूची जागा सुचविली होती

कोकणातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षाकडून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जागा सूचविणारे पत्र दाखवित सॉईल टेस्टींगला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आधीच जाहिर केल्याप्रमाणे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सोलगांव बारसू या गावांचा दौऱा केला. सोलगांव येथे पोहचल्यानंतर …

Read More »

कोरोना संसर्गाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने केली मोठी घोषणा आता आरोग्य आणिबाणी राहिली नाही

तब्बल तीन वर्ष संपूर्ण जगभरात कोरोनामुळे मोठी उलथापालथ झाली. ज्यामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं होतं, त्या कोरोनाला जागतिक आरोग्य संघटनेने आणिबाणीच्या वर्गवारीतून वगळलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं जाहिर केले की, कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणिबाणी राहिलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उत्तराधिकारी नेमणे ही माझ्या ठरवलेल्या…. ज्यांना जायचं त्यांनी जावं, पण अशी वेळ येते तेव्हा नेतृत्वानं नरमाईचे धोरण घ्यायचं नसतं हे मला कळतं

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानकपणे जाहिर केलेला निवृत्तीचा निर्णय आणि त्यानंतर अजित पवार यांच्याबद्दल निर्माण झालेली संशयाची सुई आणि पक्षाचे कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका या …

Read More »

गैरहजेरीच्या संशयावर अजित पवार यांचा खुलासा, राष्ट्रवादी कुटुंब, साहेबांच्या नेतृत्वाखाली… पवारसाहेबांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन येणाऱ्या काळात सर्वांनी अधिक जबाबदारी उचलावी...

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. शरद पवार हेच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह …

Read More »

जलद न्यायासाठी पर्यायांचा स्वीकार गरजेचा राज्यस्तरीय वकिल परिषदेत न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मत

न्यायव्यवस्थेवरील वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणाऱ्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आधुनिक काळातील साधणे, तंत्रज्ञानाचा स्वीकार करून काम करणे गरजेचे आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महाराष्ट्र आणि गोवा वकिल परिषदेच्यावतीने शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय …

Read More »

दोन वर्षांत सर्व आदिवासी आश्रमशाळांच्या वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण करणार आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांची ग्वाही

आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविणेही राज्य शासनाची प्राथमिकता असून येत्या दोन वर्षात राज्यातील सर्व आश्रमशाळांमधील वसतीगृहांचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासन विशेष कार्यक्रम राबविणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची दर दोन महिन्यातून तर शिक्षकांची दर तीन महिन्यातून परीक्षा घेण्यात येणार आहे अशी माहिती आदिवासी …

Read More »

शरद पवार यांनी जाहिर केला निर्णय; माफी मागतो, मी माझा निर्णय मागे घेतो कार्यकर्त्ये आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी दाखविलेल्या प्रेमाचा आदर करतो

राजकिय आत्मचरित्राच्या लोक माझे सांगाती या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत मोठा निर्णय घेतला होता. मात्र मागील दोन दिवस कार्यकर्ते आणि नेत्यांनी दाखविलेल्या प्रेम व आग्रहामुळे अखेर आपला निर्णय मागे घेत असल्याचे सांगत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद ग्रहण करत …

Read More »

जयंत पाटील यांचे आवाहन, प्रागतिक पक्ष भाजपाच्या विरोधातच-मविआने विश्वासात घ्यावे शेकाप नेते भाई जयंत पाटील यांचे आवाहन

राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपासोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी काल येथे केले. राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची संवाद सभा काल चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात आयोजित …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…. फरकही पंतप्रधानांना कळू नये हे देशाचे दुर्भाग्य बजरंग बलीच्या आड लपून भाजपला ४० टक्के कमीशनचे पाप झाकता येणार नाही

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेचे मोठे समर्थन मिळत असून काँग्रेस पक्ष सत्तेत येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपा सैरभैर झाला असून पराभव दिसत असल्याने ते आता धर्माच्या नावावर जनतेत संभ्रम निर्माण करत आहेत. कधी रामाच्या नावावर तर कधी बजरंग बलीच्या नावावर ते मतं मागत …

Read More »

निवड समितीने घेतला शरद पवार यांच्या “अ”-पेक्षे (विरूध्द) निर्णय, प्रफुल पटेल यांची माहिती राजीनामा एकमताने फेटाळला

दोन-तीन दिवसांपूर्वी आपल्या राजकिय आत्मचरित्राच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीसह पुढील भाग प्रसिध्द करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समितीची घोषणा केली. त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याच्या फेरविचार करावा या मागणीसाठी मागील दोन तीन दिवसापासून नेत्यांसह, पक्ष कार्यकर्त्यांकडून …

Read More »