Editor

शेकापचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

पेण ( जि. रायगड ) चे शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. याखेरीज शहादा (जि. नंदुरबार), परभणी, वसई विरार येथील काँग्रेस, अखिल भारतीय सेना या पक्षाच्या …

Read More »

आदित्य ठाकरे उभे राहताच मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ऐ खाली बस, काय कळत तुला… अजित पवारांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेचा टोला

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शेकडो टन कांदा बाजारात विकूनही २ रूपये मिळल्याचे आणि १ रूपया जास्तीचा भरावा लागल्याची घटना उघडकीस आली. तसेच कांद्याला भाव नसल्याने अनेक शेतकरी आपला कांदा रस्त्यावर टाकून देत आहेत. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून विधानभवनात आणि दोन्ही सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न आक्रमक पध्दतीने मांडत आहेत. अजित पवार यांनी विधानसभेत कांदासह …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा भरत गोगावले यांच्या प्रतोद निवडीलाच दिले आव्हान

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात अर्धवट राहिलेली सुनावणी आज सोमवारी २८ तारखेपासून पुन्हा सुरु झाली. आज ठाकरे गटाकडून काही मुद्दे राहिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत भरत गोगावले यांच्या प्रतोदच्या नियुक्तीला आव्हान …

Read More »

कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर अजित पवारांच्या मागणीवर मुख्यमंत्री म्हणाले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान रोखण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन

राज्यातला कांदा, कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. त्यांचा माल कवडीमोल दराने विकला जात आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर तातडीने सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब आम्ही सरकारच्या …

Read More »

कांदा, द्राक्षे, हरभरा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरे गटाने कामकाज बंद पाडले शिंदे-फडणवीस सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नानी देणे घेणे नसल्याने प्रस्ताव चर्चेला येऊ दिला नसल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

मागील काही दिवसांपासून कांदासह द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकरी उत्पादनाच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होत आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला ८०० किलो कांदा विकून अवघ्या २ रूपयांचा चेक मिळाला तर दुसऱ्या एका शेतकऱ्याला खर्च वजा जाता एक रूपया जास्तीचा मोजावा लागला. यावरून कांदा उप्तादक, द्राक्षे, कापूस, हरभरा शेतकऱ्यांचे होणारे हे …

Read More »

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो गळ्यात कांद्याच्या आणि कापसाच्या माळा घालत महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक... जोरदार घोषणाबाजी...

सरकार प्रचारात व्यस्त, कांदा उत्पादक शेतकरी मात्र उध्वस्त… शेतकरी द्रोही सरकारचा निषेध असो… कांद्याला भाव मिळालाच पाहिजे… कापसाला भाव मिळालाच पाहिजे… हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे… दोन रुपयाचा चेक देणार्‍या सरकारचा निषेध असो… शेतकऱ्यांची चेष्टा करणार्‍या सरकारचा निषेध असो… गद्दार सरकार जोमात, शेतकरी मात्र कोमात… कांदा, कापसाने रडवलं सरकारने कमावलं, वा …

Read More »

भाजपा नेत्याच्या त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, देशासमोरचे प्रश्न संपले का? नाव बदल आयोग स्थापनेसंदर्भात दाखल केली होती याचिका

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीची जोरदार चर्चा आहे. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयातील वेगळ्याच सुनावणीची चर्चा राष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे. कारण देशपातळीवर घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करून केंद्रात ‘नावबदल आयोगा’ची स्थापना करण्याची मागणी दिल्लीतील एका भाजपा नेत्याने सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे केली. या याचिकेवरील …

Read More »

आणि मिलिंद नार्वेकरांच्या विधानभवनातील उपस्थितीवरून आदित्य ठाकरेंनीच उपस्थित केला सवाल प्रश्न उपस्थित करताच मिलिंद नार्वेकर पडले बाहेर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. मात्र राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सातत्याने अधिवेशन काळात विधानसभेतील किंवा विधान परिषदेतील आमदारांसाठी असलेल्या लॉबीत जाऊन शिंदे गटाच्या मंत्र्यांना भेटत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपालांच्या …

Read More »

आश्वासनांची पुर्तता न केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे २८ फेब्रुवारीपासून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा इशारा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने गेली साडेपाच वर्षे तर केंद्र शासनाने गेली साडेचार वर्षे मानधनात कोणतीही वाढ दिलेली नाही. पोषण, शिक्षण, आरोग्य विषयक महत्वाचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व महागाई भत्त्यासह वेतनश्रेणी, मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठीत करणे, नवीन मोबाईल, ग्रॅच्युईटी लागू करणे व आहार व इंधनाचे …

Read More »

अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान, चहापानावर बहिष्कार हा देशद्रोह कसा, सिध्द करा विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांची मागणी, वेलमध्ये विरोधकांची घोषणाबाजी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जर गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता अशी टीका केली. त्यास प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीला हसिना पारकर हिला पैसे दिले, तो मंत्री तुरुंगात …

Read More »