Editor

वरळीतील सभेवरून अजित पवार म्हणाले, सर्वसामान्यांच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांची जंगी सभा… एकाच वाक्यात उडविली खिल्ली

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वरळी येथील जांबोरी मैदानावर कोळी बांधवांकडून जाहिर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भाषण करत असताना काही लोक उठून जात असल्याचा आणि सभेच्या ठिकाणच्या अनेक खुर्च्या रिकाम्या असल्याचा एक व्हिडिओ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केला. …

Read More »

डॉ प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोराची आई म्हणाली, दारूच्या नशेत केलं… सातव यांच्या कोहिनूर बंगल्यासमोर हल्लेखोर महेंद्र डोंगरदिवेच्या आईनी मांडली व्यथा

कोविड काळात काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या झालेल्या निधनानंतर पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला. प्रज्ञा सातव यांनी स्वत: या प्रकाराची माहिती दिली आहे. हिंगोलीतील कळमनुरीच्या कसबे धवंडा गावात प्रज्ञा सातव गेल्या असता हा प्रकार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. या …

Read More »

डॉ सातव हल्याप्रकरणी नाना पटोलेंचा निशाणा, फडणवीसांची पोलिस दलावर पकड नाही… काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करा

काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित राहिले नसून काँग्रेस आमदार डॉ. प्रज्ञा …

Read More »

अद्यापही पंतप्रधान मोदींना भीती कोरोनाची कोरोना चाचणी नसेल तर तुम्ही पंतप्रधानांच्या जवळपासही भटकू शकत नाही-एसपीजीचे तोंडी आदेश

कोरोना संक्रमणाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्विकारलेल्या चुकीच्या धोरणावर अद्यापही टीका करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या चुकिच्या धोरणावर आतापर्यंत तरी पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारने, भाजपाने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र ज्या काळात कोरोना संक्रमणाच्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, …

Read More »

महसूल मंत्री विखे-पाटील यांचे संकेत, शहरी भागातील अकृषिक कर माफ होणार शहरी भागातील निवासी, औद्योगिक आणि वाणिज्यिक जमीनीवरील अकृषिक कर

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार नागरी क्षेत्रातील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर ठरविण्यात येत असतो. निवासी, औद्योगिक किंवा वाणिज्यिक प्रयोजनाकरिता वापरण्यात येणाऱ्या जमिनींवरील अकृषिक कर घेण्यात येतो. मात्र, शहरी भागातील जमीनधारकांसाठी अकृषिक कर माफ करण्यासंदर्भातील मागणीचा विचार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील शहरी भागातील गृहनिर्माण …

Read More »

अंबादास दानवेंचा आरोपः आदित्य ठाकरेंवरील हल्याप्रकरणी पोलिसांचा गाफीलपणा पोलिस महासंचालकांकडे केली तक्रार

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात झालेल्या दगडफेकीमुळे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी संताप व्यक्त केला असून . स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत गाफीलपणा केल्याचा तक्रार त्यांनी पोलीस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे आदित्य ठाकरेंच्या दिशेने आलेले दगड जणू कुणीतरी त्या लोकांच्या हातात आणून …

Read More »

मुंबई पोलिसांकडून शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी मुंबईत शस्त्रास्त्रे, हत्यार, स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत ५ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

बृहन्मुंबईतील सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये शस्त्रास्त्रे, हत्यार, संक्षारक पदार्थ किंवा स्फोटकांसह विविध गोष्टींबाबत ५ मार्चपर्यंत कलम ३७ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश बृहन्मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत. बृहन्मुंबईचे पोलिस उप आयुक्त (अभियान) विशाल ठाकूर यांनी हे आदेश जारी केले असून कलम 37 चे उप कलम (1) …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी, पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा करा शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसाढवळया हत्या करण्यात आली आहे. ही घटना अपघात आहे असे दाखवण्याचा बनाव करण्यात आला परंतु ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पत्रकार वारिशे यांची हत्या करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. यासंदर्भात …

Read More »

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून तर राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४ चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, हे जनाधार नसणारं सरकार मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत यातून आज काय परिस्थिती आहे हे स्पष्टपणे महाराष्ट्रा पुढे आले...

मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे वारंवार सिद्ध होत आहे असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना शिंदे – फडणवीस सरकारवर केला. आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान भवनात पार पडली. त्यानंतर …

Read More »